२३२ दिवस कैदेत राहून आलेल्या उमर अब्दुल्लांनी दिल्या ‘या’ लॉकडाऊन टीप्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘कुणाला क्वारंटाईन किंवा लॉकडाऊन दरम्यान जिवंत राहण्यासाठी काही टीप्स हव्या असतील तर माझ्याकडे अनेक महिन्यांचा अनुभव आहे’ असं म्हणत उमर अब्दुल्लांनी एकीकडे केंद्र सरकारला टोला लगावला. तर दुसरीकडे त्यांनी खरोखरच या परिस्थितीत काय काय करता येईल? याच्या काही टीप्स लोकांना ट्विटरवर दिल्या आहेत.

२३२ दिवसांच्या कैदेनंतर मंगळवारी दुपारी हरी निवास सब जेलमधून उमर अब्दुल्ला यांची सुटका करण्यात आली आहे. कैदेतून सुटका झाल्यानंतर ते आता पुन्हा एकदा जनतेशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधत आहेत. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. याचाच संदर्भ देत उमर अब्दुल्लांनी कैदेतील आपला अनुभव ट्विटरवर शेअर करत लोकांना काही लॉकडाऊन टीप्स दिल्या आहेत.

लोकांना लॉकडाऊनच्या कालावधीत वेळ घालवण्यासाठी टीप्स देत उमर अब्दुल्ला आपल्या ट्विटमध्ये लिहतात, ‘सर्वात अगोदर तर आपल्यासाठी एक रुटीन तयार करा आणि त्याचं पालनही करा. मी हरी निवास सब जेलमध्ये अनेक महिने राहिलो. मीही तिथं असंच रुटीन तयार केलं आणि ते फॉलो करत आयुष्य काढलं’ असंही त्यांनी म्हटलंय. ”व्यायाम, व्यायाम आणि व्यायाम करा. मी या मुद्यावर फार जोर देऊ शकणार नाही. पण मी भाग्यशाली होतो की मला बाहेर पडण्यासाठी हरी निवास सब जेलमध्ये जागा मिळाली, मैदान मिळालं. परंतु, वातावरणानं मला बाहेर जाण्याची परवानगी दिली नाही तेव्हा घरात इकडे तिकडे आणि पायऱ्या चढण्या-उतरण्याशिवाय पर्याय नव्हता. हो, वर्कआऊटसाठी मोबाईल ऍपचीही मदत घेऊ शकता,” असं म्हणत उमर अब्दुल्ला यांनी आपलं कैदेतल्या आयुष्यवरही प्रकाश टाकला.

”तुमच्या भोजनाची वेळ निश्चित करा आणि ती पाळा. बोर्डिंग स्कूलची सवय आणि आवश्यकतेनुसार मी वेळापत्रक बनवलं. ८.३० ला नाश्ता, दुपारी २.०० वाजता जेवण आणि ७.३० वाजता रात्रीचं जेवण अशी वेळ ठरवली. हो, दुपारी १२.०० वाजता (बीपी चेकअपनंतर) कॉफीचीही वेळ ठरलेली होती आणि सायंकाळी ६.०० वाजता चहाची,” असं सांगत त्यांनी लोकांना डायट टीप्स सुद्धा दिल्या.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment