राज्यात करोनाचा ७ वा बळी; मुंबईत ४० वर्षीय महिलेचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनाने सातवा बळी घेतला आहे. मुंबईत एका ४० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल शनिवारी या महिलेला छातीत दुखू लागलं म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी तिचा मृत्यू झाला आहे. या महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. मुंबईत आतापर्यंत करोनानं ५ बळी घेतले आहेत. तर मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातून मुंबईत उपचारासाठी आलेल्यांपैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

हायपरटेन्शनचा विकार असलेल्या या महिलेला शनिवारी मुंबई महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या तीन-चार दिवसांपासून तिच्या छातीत दुखत होतं. तसंच, श्वास घेताना प्रचंड त्रास होत होता. रुग्णालयात दाखल करतेवेळी तिची प्रकृती चिंताजनक होती. दाखल होताच लगेचच तिची स्वॅब टेस्ट करण्यात आली. त्या चाचणीचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला होता. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १९३ वर पोहोचली आहे. आज पुण्यात ५, मुंबई ४, जळगाव, सांगली,नागपुरात प्रत्येकी १ नवा रुग्ण सापडला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’

हे पण वाचा –

महाराष्ट्रात आढळले ७ नवे करोनाबाधित;संख्या १९३वर

भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?

भयावह! इटलीत २४ तासांत कोरोनाने घेतला ९००हून अधिक जणांचा बळी

बेजबाबदारपणाचा कळस; IAS अधिकारीचं होम क्वारंटाइनमधून पळाला

भारतात ‘या’ ठिकाणी रोबोट करणार कोरोना रुग्णांची देखभाल!

नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन

Leave a Comment