दिलासादायक! पिंपरी-चिंचवडमध्ये ५ कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यासह देशात करोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. दिवसेंदिवस करोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत. अशा चिंताजनक परिस्थितीत एक दिलासादायक बाब समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आज पुन्हा ५ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. करोनाशी यशस्वी सामना केल्याबद्दल भोसरी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे आभार मानले.

दोन दिवसांपूर्वी डिस्चार्ज केलेले ३ आणि आजचे ५ असे एकूण ८ करोनामुक्त रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरात एकूण १२ रुग्ण होते. त्यापैकी ४ रुग्णांवर आता उपचार सुरु आहेत. त्यापैकी १५ मार्चला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालेल्या करोना पॉझिटिव्ह रुग्णाची पहिली चाचणी निगेटिव्ह आलेली आहे. दुसरे नमुने आज पाठवले असून ते ही निगेटिव्ह आले तर त्या कोरोनाबाधितास उद्या डिस्चार्ज दिला जाईल.

दरम्यान, राज्यात ७ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या १९३ झाली आहे. ७ रुग्णांपैकी ४ मुंबईतले तर पुणे, नागपूर आणि सांगली या ३ शहरांमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आहे. भारतात आतापर्यंत करोनाग्रस्तांचा आकडा १ हजारांवर पोहोचला आहे. तर देशात २५ करोनाने लोकांचा बळी घेतला आहे. देशातील सर्वाधिक करोना बाधित महाराष्ट्रात असून महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्ये करोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. देशातील २७ राज्यांमध्ये करोना हैदोस घालत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’

हे पण वाचा –

महाराष्ट्रात आढळले ७ नवे करोनाबाधित;संख्या १९३वर

भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?

भयावह! इटलीत २४ तासांत कोरोनाने घेतला ९००हून अधिक जणांचा बळी

बेजबाबदारपणाचा कळस; IAS अधिकारीचं होम क्वारंटाइनमधून पळाला

भारतात ‘या’ ठिकाणी रोबोट करणार कोरोना रुग्णांची देखभाल!

नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन

Leave a Comment