भारतात अडकलेल्या नागरिकांना अमेरिका करणार ‘एअरलिफ्ट’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं असून अनेक देश लॉकडाऊन आहेत. अशा परिस्थितीत अनेक देशांचे नागरिक वेगवेगळ्या देशांमध्ये अडकले आहेत. दरम्यान भारतात अडकलेल्या आपल्या सर्व नागरिकांना एअरलिफ्ट करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे.

भारतात लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने अमेरिकेतील जवळपास २ हजाराहून जास्त नागरिक अडकले आहेत. भारताने सर्व परदेशी विमान भारतात उतरण्यास बंदी घातली आहे. अशा परिस्थिती अमेरिकेच्या नागरिकांना आपल्या मायदेशी परतण्यास कोणताही पर्याय नव्हता. आपल्या नागरिकांची अडचण लक्षात घेत अमेरिकेने या सर्वांना विशेष विमानाने एअरलिफ्ट करण्याची तयारी सुरु केली आहे.

अमेरिकन सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भारतात लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने तसंच अनेक विमानं रद्द करण्यात आल्याने तिथे अडकलेल्या दोन हजार नागरिकांना एअरलिफ्ट करण्यासाठी तयारी सुरु कऱण्यात आली आहे. यामधील दीड हजार अमेरिकन नागरिक नवी दिल्लीत आहेत. तर मुंबईत ६०० ते ७०० जण अडकले आहेत. याशिवाय ३०० ते ४०० नागरिक इतर ठिकाणी अडकल्याची भीती असून त्यांना त्यांची ओळख पटवून देण्यास सांगण्यात आलं आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment