दररोज लाखाच्या महसुलावर मनपा सोडते ‘पाणी’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – कोरोनाची तिसरी लाट झपाट्याने कमी होत आहे. शासन आदेशानुसार बीबी का मकबरा, पाणचक्की इत्यादी पर्यटन स्थळे खुली करण्यात आली आहेत. मात्र शहरातील सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला अद्यापही कुलूप लावलेले आहे. त्यामुळे महापालिकेला दररोज एक लाख रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे.

औरंगाबाद शहरात दरवर्षी 30 लाखांवर पर्यटक येतात. बहुतांश पर्यटक मकबरा, पानचक्की, औरंगाबाद लेण्या, दौलताबाद किल्ला पाहतात. सायंकाळी अनेक पर्यटक सिद्धार्थ उद्यान आणि प्राणी संग्रहालय पाहण्यासाठी येतात. तिकीटातून दररोज 40 हजारांचा महसूल महापालिकेला प्राप्त होतो. प्राणिसंग्रहालयात तिकीट दर जास्त असल्याने तेथूनही दररोज 50 ते 60 हजारांचा महसूल मिळतो.

तिसऱ्या लाटेमुळे सर्व पर्यटनस्थळे बंद करण्यात आली होती. मात्र, आता शासन आदेशानुसार सर्व पर्यटनस्थळे खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे विविध पर्यटनस्थळे गजबजली आहेत. मात्र, महापालिकेने सिद्धार्थ उद्यान आणि प्राणीसंग्रहालय अद्याप बंदच ठेवले आहे

Leave a Comment