औरंगाबाद | शहरात असलेल्या ऐतिहासिक वारसा पैकी एक असलेला महेमूद दरवाजा दुरुस्तीनंतरही वारंवार ढासळत असलेला महेमूद दरवाजा अखेर पाडण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. त्यानंतर हा ऐतिहासिक दरवाजा पुन्हा जशास तसा उभारला जाणार आहे. याचे स्ट्रक्चरल ऑडिट पुर्ण झाले असल्याची माहिती, स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांनी दिली आहे.
शहरातील खामनदी पुलावरील ऐतिहासिक महेमूद दरवाजा जीर्ण झाला आहे. आतापर्यंत अनेकदा या दरवाजाचा काही भाग कोसळला आहे. गेटचा दरवाजाही निखळला आहे. त्यासाठी मनपाने लावलेले लोखंडी ॲंगल देखील वर्षभरातच दोनदा कोसळले आहे. त्यातच सध्या पावसाळा सुरू आहे, अशातच हा दरवाजा कधीही कोसळू शकतो, त्यामुळे मनपाने हा दरवाजा पाडून नव्याने बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
स्मार्ट सिटीच्या निधीतून हे काम होणार असून, निविदा प्रक्रीयेनंतर गेटचे काम केले जाणार आहे. गेटचे नवीन बांधकामही जसेच्या तसे केले जाणार आहे, असे स्मार्ट सिटीचे अरूण शिंदे यांनी सांगितले आहे.