Wednesday, February 8, 2023

मनपाची शाळा बनली जुगाराचा अड्डा !

- Advertisement -

औरंगाबाद – शहरात चक्क महापालिकेच्या शाळेतच जुगार अड्डा सुरु असल्याचा प्रकार समोर आला. पोलिसानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून तब्बल १४ जुगारींना पकडले. कारवाई झाली खरी मात्र पोलिसांचा वचक नसल्याने चक्क जुगाऱ्यांची चक्क शाळेतच अड्डा बनविला होता. हा प्रकार रविवारी (ता.२६) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास शास्त्रीनगरातील महापालिका शाळेच्या सुरक्षारक्षकाच्या खोलीत उघडकीस आला.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुभाष झंडूराम राणा, गौतम नारायण बहुरे, मनोज दिगंबर देवरे, मनोहर नारायण भवरे, शेख चाँद शेख हुसेन, अन्सार रशिद शेख, कदीर नजीर पठाण, मुजफ्फर अफसर शेख, आबीद सादीक कुरेशी, अनिल बबन गुडीवाल, इजाज फिरोज कुरेशी, तालिब मोहम्मद शरीफ खान, नामदेव शिवलाल चव्हाण, मुसा उस्मान शेख या जुगाऱ्यांना ताब्यात घेतले.

- Advertisement -

पोलिसांनी जुगाऱ्यांकडून साहित्य व रोख असा ६५ हजार ४१० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक वसंत शेळके यांच्या तक्रारीवरुन जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.