महाबळेश्वरमध्ये नगरसेविकेचे हाॅटेल कोरोना बाधितांसाठी मोफत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी 

महाबळेश्वर येथील जेष्ठ नगरसेविका विमलताई पारठे यांनी आपले संपुर्ण हॉटेल कोरोना बाधित रूग्णांच्या विलगीकरण कक्षासाठी मोफत पालिकेच्या स्वाधीन केले आहे. या विलगीकरण कक्षात दाखल होणाऱ्या कोरोना बाधित रूग्णांच्या नाश्ता, चहा व दोन वेळच्या जेवणाची सोय नगरसेवक रविंद्र कुंभारदरे हे मोफत करणार आहेत. या दोन नगरसेवकांच्या दातृत्वाचे शहरातुन कौतुक होत आहे.

कोरोनाचे रूग्ण भरमसाठ वाढु लागले आहेत. येथील लहान घरे असलेल्या कुटूंबातील जर कोणाला कोरोनाची लागण झाली. तर त्यांची घरात स्वतंत्र सोय करणे शक्य होत नाही, अशी लक्षणे नसलेल्या व विलगीकरणाची घरी गैरसोय असलेल्या कोरोना बाधित रूग्णांच्या सोईसाठी नगराध्यक्षा यांनी विलगीकरणाची सोय केली होती. परंतु या कक्षात दाखल होण्यासाठी पाच हजार रूपये भरावे लागणार होते. कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर झाला, असुन अनेकांचे रोजगार बंद आहेत. अशा स्थितीत विलगीकरण कक्षासाठी पाच हजार रूपये भरणे कठीण होणार असल्याने अशा कोरोना रूग्णांच्या मदतीसाठी येथील माजी नगराध्यक्षा व विदयमान नगरसेविका यांनी विलगीकरणासाठी आपले संपुर्ण हॉटेल पालिकेच्या स्वाधीन केले आहे.

येथील सुभाष चौकात प्रेसिंडेट नावाचे पारठे यांचे हॉटेल आहे. विलगीकरण कक्ष सुरू करण्यापुर्वी तेथे कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहे, याची पाहणी पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केली. या वेळी उपनगराध्यक्ष अफजल सुतार, माजी नगराध्यक्ष डी.एम. बावळेकर, नगरसेविका विमलताई पारठे, शारदा ढाणक, स्नेहल जंगम, नगरसेवक रवींद्र कुंभारदरे, संदीप साळुंखे, प्रकाश पाटील, संजय पिसाळ, ॲड. संजय जंगम आदी मान्यवरांसह रोहीत ढेबे, संदीप मोरे, अनिकेत रिंगे, संजय दस्तुरे हे देखिल उपस्थित होते. हॉटेल मध्ये दोन दिवसात विलगीकरण कक्ष प्रारंभ करणार असल्याची माहीती या वेळी मुख्याधिकारी यांनी दिली.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment