३१ जानेवारीपासून तुम्हाला ‘हे’ अ‍ॅप वापरता येणार नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । मायक्रोसॉफ्टने अलीकडेच त्याच्या विंडोज 7 बंद केले आहे. दरम्यान, आता कंपनीने आणखी एक सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. मायक्रोसॉफ्टने याची पुष्टी केली आहे. मायक्रोसॉफ्ट अँड्रॉइड(microsoft android) आणि आयओएससाठी (ios) व्हर्च्युअल असिस्टंट कोर्टेना (virtual assistant cortana) बंद करीत आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ३१ जानेवारीपासून अँड्रॉइड लाँचरवरून कोर्टेना (microsoft launcher app) अप काढून टाकण्यात येणार आहे. हे अ‍ॅप केवळ अमिरिके मध्येच वापरता येणार असे कंपनीने म्हटलं आहे.

मायक्रोसॉफ्टच्या सपोर्ट पेजवरील माहितीनुसार, मायक्रोसॉफ्ट ३१ जानेवारी, २०२० रोजी भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चीन, जर्मनी, मेक्सिको, स्पेन आणि इंग्लंडमधील कॉर्टाना अ‍ॅपचा सपोर्ट बंद करणार आहे.

un (52)

कॉर्टाना टीमचे नेते अँड्र्यू शुमान यांनी व्हेंचरबीचला सांगितले की, कोर्टेना मोबाईल अ‍ॅप (आणि मायक्रोसॉफ्टच्या अँड्रॉइड लाँचरमधील कोर्ताना इंटिग्रेशन) अमेरिका वगळता सर्व देशांत ३१ जानेवारीला बंद करण्यात येत आहे. शुमानने सांगितले की, अमेरिकेत अजूनही असे अनेक लोक आहेत जे आपल्या हेडफोन ऑपरेशन्स मैनेज करण्यासाठी कोर्टेना अ‍ॅपचा वापर करतात. ते पुढे म्हणाले कि, तुमच्याकडे सरफेस हेडफोन असल्यास कॉर्टाना अ‍ॅपसह वापरू शकता आणि आम्ही अजूनही त्यास सपोर्ट देत आहोत.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा

हे पण वाचा-

.. तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू- अशोक चव्हाण

मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका, तो मान बाळासाहेबांचा – राज ठाकरे

दामदुप्पट रक्कम देण्याचे अमीष दाखवून पंढरपुरात ११०० नागरिकांची आर्थिक फसवणूक

 

Leave a Comment