धक्कादायक, केवळ २ तासात २१ देशांतून १२,००० ट्रान्झेक्शन्स करुन त्यांनी घातला काॅसमाॅस बँकेला गंडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | काॅसमाॅस बँकेवर आजवरचा सर्वात मोठा सायबर हल्ला झाला आहे. केवळ २ तासात वेगवेगळ्या अशा २१ देशांतून एकूण १२,००० ट्रान्झेक्शन्स करुन महाराष्ट्रातील काॅसमाॅस बँकेला गंडा घालण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर प्रकरण मोठे सायबर क्राइम असल्याचे काॅसमाॅस बँकेचे चेअरमन मिलिंद काळे यांनी म्हटले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, जगभरातील वेगवेगळ्या २१ देशात शनिवारी एकाच वेळी एकून १२,००० बँकव्यवहार करण्यात आले आहेत. यासाठी ४५० इंटरनेशनल व्हिसा डेबिट कार्ड वापरण्यात आल्याचे समोर आले आहे. गुन्हेगार चपळाई दाखवत केवळ २ तास १३ मिनिटं एवढ्या वेळात वेगवेगळ्या ठिकाणांहून १२,००० ट्रान्झेक्शन्स करण्यात यशस्वी झाले आहेत. भारतात २,८०० अवैद्य ट्रान्झेक्शन्स द्वारा अडीच करोड रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे समजत आहे.

सदरील गुन्हा हा सायबर क्राइमचा असून तो वेगवेगळ्या २१ देशांत एकाच वेळी घडला असल्याने यामागे मोठे नियोजन असून हा आंतराष्ट्री गुन्हा असल्याचे पोलीसांनी म्हटले आहे. कोणाही ग्राहकाच्या खात्याला यामुळे धक्का लागलेला नसून सर्व ट्रन्झेक्शन्स डमी कार्ड वापरु करण्यात आली असल्याचे मिलिंद कांबळे यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

 

 

Leave a Comment