Cotton Farming | कापूस हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे असे पीक आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये कापसाच्या पिकाची लागवड केली जाते .कापूस एक नगदी पीक आहे. खास करून उत्तर महाराष्ट्रात संपूर्ण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली पाहायला मिळते. परंतु गेल्या दोन-तीन वर्षापासून कापूस उत्पादक शेतकरी अनेक समस्यांचा सामना करत आहे. कापसाला बाजारात पाहिजे तेवढा भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांना कापसाचे पीक घेण्यासाठी देखील परवडत नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक दृष्ट्या अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.
सध्या कापूस हंगामातील वेचणीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे बाजारात देखील विक्री सुरू झालेली आहे. या कापसाला (Cotton Farming) बाजारात सध्या सव्वा 7 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. परंतु शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला भाव अजूनही कापसाला मिळत नाही. अशातच दसरा तोंडावर आलेला आहे. आणि दसऱ्यानंतर महाराष्ट्रात दरवर्षी कापसाची आवक वाढत असते. अशातच महाराष्ट्रातील सगळ्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आम्ही अलेलो आहोत.
ती म्हणजे आता शेतकऱ्यांकडे कापूस दिवाळी पूर्वीच खरेदी केला जावा. यासाठी पण ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटन श्रीराम सातपुते यांनी याचिका दाखल केलेली आहे. या याचिकेवर न्यायालयात देखील सुनावणी झालेली आहे. अशातच आता भारतीय कापूस महामंडळाने उच्च न्यायालयात सरकारी कापूस खरेदी केंद्र कधी सुरू होणार आहे. याची माहिती दिलेली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता 1 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात कापूस खरेदी केंद्र सुरू होणार आहेत.
त्यामुळे आता ऑक्टोबर महिन्यात पासून महाराष्ट्रात जवळपास 110 कापूस खरेदी केंद्र सुरू केली जाणार आहे. अशी माहिती महामंडळाने दिलेली आहे. तसेच ही माहिती रेकॉर्डवर घेऊन या प्रकरणातील सुनावणी ऑक्टोबर महिन्यात जाहीर केली जाणार आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 14 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. शेतकऱ्यांकडून दरवर्षी कापूस खरेदी केंद्र उशिरा सुरू होते. त्यामुळे खाजगी व्यावसायिक त्याचा फायदा उचलतात असा आरोप देखील केला जात आहे. परंतु आता महामंडळ आहे. ऑक्टोबर महिन्यात कापूस खरेदी सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु आता नक्की पुढील महिन्यातच कापसाचे केंद्र सुरू होणार आहे का? हे पाहणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे.