Sunday, April 2, 2023

कापसाच्या जिनिंगला भीषण आग ; लाखो रुपयांचा कापूस जळून खाक

- Advertisement -

अमरावती प्रतिनिधी । अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील साबळे जिनींगप्रेसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत जिनींगमधील लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाला आहे. या आगीने परिसरात भीतीचे वातारण निर्माण झाले आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की साबळे जिनींग प्रेसला दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे जिनींगमध्ये एकच गोंधळ उडाला होता. तिथं उपस्थित असणाऱ्या काही नागरिकांनी हि माहिती दर्यापूर पोलीस स्टेशनला दिली. पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अग्निशामक दलाला पाचारण केलं. या माहितीवरून अग्निशामक दलाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाला आहे.

- Advertisement -

आगीने उग्ररुप धारण केल्यामुळे सगळीकडे धूर पसरला होता. या जिनींगमध्ये काही कामगार काम करत होते. मात्र त्यांना कोणतेही नुकसान पोहचले नाही हे सुदैवच. पोलीस घटनस्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.