हॅलो महाराष्ट्र । पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांचा एक फोटो शेअर केला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम मोदी सरकारने रद्द केल्यापासून उमर अब्दुल्ला नजरकैदेत आहेत.
ममता बॅनर्जी यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केलेल्या फोटोमध्ये उमर अब्दुल्ला लांब पांढऱ्या दाढीमध्ये हसताना आणि टोपी घातलेले दिसत आहेत. मात्र, हा फोटो कधी घेण्यात आला हे अजून स्पष्ट झाले नाही. ममता बॅनर्जी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “या फोटोत मी उमरला ओळखू शकले नाही. मला वाईट वाटते. आमच्या लोकशाही देशात हे घडत आहे. हे कधी संपेल?”
I could not recognize Omar in this picture. Am feeling sad. Unfortunate that this is happening in our democratic country. When will this end ? pic.twitter.com/lbO0PxnhWn
— Mamata Banerjee (@MamataOfficial) January 25, 2020
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा
हे पण वाचा-
समीरसिंह साळवे यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर; नक्षलवादाविरुद्ध लढ्यात सक्रिय योगदानाबद्दल गौरव
आदर्शग्राम हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर