हॅलो महाराष्ट्र । प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देण्यात आलेल्या पद्मश्री पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी २१ नामांकित व्यक्तींना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पोपटराव पवार, राहीबाई पोपरे, ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, आणि माजी क्रिकेट खेळाडू जाहीर खान यांना पदमश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच बाबा जगदीश लाल अहुजा, सामाजिक कार्यकर्ते जावेद अहमद टेक, सामाजिक कार्यकर्ते सत्यनारायण मुंडयूर, सामाजिक कार्यकर्ते एस रामकृष्ण, सामाजिक कार्यकर्ते योगी आरोन यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाईल. त्याचबरोबर १९८४ भोपाळ गॅस ट्रॅजेडीचे कार्यकर्ते अब्दुल जब्बार यांनाही मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.
या २१ जणांना मिळणार पद्मश्री
१.पोपटराव पवार
२.राहीबाई सोमा पोपरे
३.जगदीश लाल अहुजा
४.मोहम्मद शरीफ
५.जावेद अहमद टाक
६.तुलसी गोडा
७.सत्यनारायण मुंडायुर
८.अब्दुल जब्बार
९.उषा चौमार
१०.हरेकला हजब्बा
११.अरुणोदय मंडळ
१२.राधामोहन आणि साबरमती
१३.कुशल कोंवर शर्मा
१४.त्रिनिती सावो
१५.रविकानन
१६.एस रामकृष्णन
१७.मुन्ना मास्टर
१८.योगी आर्यन
१९. हिम्मत राम भांभू
२०.मोझीकल पंकजाक्षी
२१.झहीर खान