कराड-पाटण शिक्षक सोसायटी निवडणुक निकाल : सत्ताधारी व विरोधकांच्यात घासाघासी, सत्ताधारी गटाकडे किरकोळ आघाडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । विशाल वामनराव पाटील

कराड-पाटण प्राथमिक शिक्षक सोसायटी निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाली आहे. निकाल येण्यासाठी दुपारी तीन वाजतील असे निवडणूक निर्णय अधिकारी संदीप जाधव यांनी सांगितले आहे. यामध्ये गुरुमाऊली सत्ताधारी गट व गुरुजन एकता पॅनल मध्ये अटीतटीची लढत असल्याचे दिसून येत आहे.

केवळ उंडाळे गट क्रमांक 3 मधून दिनेश थोरात हे एकमेव उमेदवार स्पष्ट विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत. सुपने, कोपर्डे, व तळमावले या गटातून दिनेश थोरात यांना 144, 160 व 176 अशी मते पडली आहेत. तर इतर ठिकाणाहून विमान या चिन्हावरील श्री गुरुमाऊली पॅनलच्या उमेदवारांनी किरकोळ 4 ते 10 मतांची आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.

आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार…

तारळे गट क्रमांक – 1 उमेदवार व सुपने, कोपर्डे, तळमावले व वडूज गटातून (कंसात पडलेली मते) – रमेश जाधव- कपबशी (95, 94, 90, 190), रामचंद्र सपकाळ – विमान (117, 116,107, 202 ).

कोळे गट क्रमांक 2– नीलम नायकवडी- कपबशी- (79,100, 83,199), अनिल पाटील- विमान- (116, 114, 133,202)

पाटण गट क्रं. – 1 गट क्रमांक- 4- सुपने, कोपर्डे व तळमावले गटातून मिळालेली मते पुढील प्रमाणे – प्रकाशराव कदम- विमान-(115,120,137). सागर पाटोळे- कपबशी-(86,95,81).

पाटण गट क्रमांक – 2 व गट क्रमांक- 5- सुपने, कोपर्डे व तळमावले गटातून मिळालेली मते पुढील प्रमाणे- आनंदा चाळके -कपबशी-(98, 102, 99). दत्तात्रय जगताप -विमान-(105, 117, 119).

काले गट – तोडकर शशिकांत – कपबशी – (88, 88, 99). संभाजी यादव – विमान – (112, 130, 117)