वयाच्या 19 व्या वर्षी शत्रूंची 9 विमाने पडणाऱ्या देशातील पहिल्या फायटर पायलट विषयी जाणून घेउयात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली भारतीय हवाई दलात एकाहून एक शूर पायलट होऊन गेले आहेत ज्यांनी 1962 पासून ते कारगिल युद्धापर्यंत आपल्या शौर्याचे प्रदर्शन घडविले आहे. स्वातंत्र्यापूर्वीही असा लढाऊ पायलट होता ज्यांच्या शौर्याची गाथा जगभर प्रसिद्ध आहे. इंद्र लाल रॉय हा पायलट होता ज्यांनी ब्रिटीशांच्या अंमलाखाली पहिल्या महायुद्धात लढा दिला होता.

कोलकाता येथे 2 डिसेंबर 1898 रोजी जन्मलेल्या इंद्रलाल रॉयच्या सर्विस रेकॉर्ड नुसार एप्रिल 1917 मध्ये रॉयल फ्लाइंग कॉर्प्सचा भाग बनले होते. जेव्हा ते ब्रिटीश हवाई दलात रुजू झाले तेव्हा ते केवळ 18 वर्षांचे होते. लंडनमधील सेंट पॉल स्कूलमध्ये शिकत असतानाच त्यांना नोकरी मिळाली. त्यांच्या प्रतिभेचा अंदाज यावरूनच लावला जाऊ शकतो की, अवघ्या 3 महिन्यांतच त्यांना सेकंड लेफ्टनंटमध्ये प्रमोशन देण्यात आले.

ब्रिटनच्या रॉयल फ्लाइंग कोर्प्सच्या वतीने पहिल्या महायुद्धात लढा देत इंद्रलाल रॉय यांनी जर्मन हवाई दल नष्ट केले. या युद्धात इंद्राने तब्ब्ल 170 तास उड्डाण केले.

यादरम्यान, त्याने अवघ्या 14 दिवसांतच 9 लढाऊ विमाने हवेतच नष्ट केली. जर्मनीशी लढताना ते केवळ 19 वर्षांचे होते. इंद्रलाल रॉय यांना त्यांच्या पराक्रम आणि साहसासाठी डिस्टिंग्विश्ड फ्लाइंग क्रॉस पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार मिळवणाते ते पहिला भारतीय व्यक्ती आहे.

त्यांच्याबद्दलचा एक लेख 21 सप्टेंबर 1918 रोजी लंडन गॅझेटमध्ये आला. या लेखात, त्यांना सर्वोत्कृष्ट आणि निडर पायलटची पदवी देण्यात आली. त्यांच्या या पराक्रमाचा संदर्भ देताना लेखात म्हटले गेले आहे की,” त्यांनी एका उड्डाणात शत्रूची दोन विमाने खाली पाडली.”

Leave a Comment