बापरे बाप!!! ऑनलाइन पध्दतीने मागितले मांजर ; निघाला वाघाचा बछडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनेक लोकांना घरामध्ये पाळीव प्राणी पाळण्याची आवड असते. काही जण कुत्रा किंवा मांजर पाळण्याचा शौक करतात. मात्र फ्रान्स मधील एका झोडप्याला मात्र ही गोष्ट चांगलंच अंगलटी आली आहे. त्यांनी जाहिरात पाहून पाच लाख रुपयांना असलेले मांजरीचे पिल्लू मागविले मात्र, घरी जे आले ते पाहून त्यांना जबरदस्त धक्का बसला.

फ्रान्सच्या नॉर्मंडीतील एका जोडप्याला मांजराची एक विशेष प्रजाती सवाना (Savannah Cat) हवी होती. या संबंधीत एक जाहिरातही त्यांनी वाचली आणि थेट ऑर्डरच देऊन टाकली. तसेच ऑनलाईन जाहिरात पाहूनच मांजरीचे पिल्लू खरेदी केले होते. त्यांना नंतर समजले की ते मांजर नसून वाघाचा बछडा होता. याबाबतचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

2018 मध्ये हा धक्कादायक खुलासा झाला होता. या छोट्या वाघाची ओळख हळूहळू पटत गेली. पोलिसांनी तपास केला असता ते मांजरीचे पिल्लू नसून ‘सुमात्रा टायगर’ आहे. हे वाघाचे रुप समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. या जोडप्याने अखेर बछड्याला फ्रान्सच्या बायोडायवर्सिटी टीमच्या हवाली केले. आता या बछड्याचे तिथेच संगोपन करण्यात येत आहे. .

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment