‘या’ प्रकरणात इंदुरीकर महाराजांना कोर्टाकडून तूर्तास दिलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर । प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज अर्थात निवृत्ती महाराज देशमुख यांनी त्यांच्या किर्तनात एक एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या प्रकरणी संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवर संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू असून, ३ जुलै रोजी न्यायालयानं त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

संगमनेर न्यायालयात आज (७ ऑगस्ट) सुनावणी झाली. सुनावणी वेळी न्यायालयानं हजर राहण्याच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे इंदुरीकर महाराज यांना न्यायालयात हजर राहण्यापासून मूभा मिळाली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २० ऑगस्ट रोजी होणार आहे.

यामुळं इंदुरीकर महाराजांवर झाला गुन्हा दाखल
१७ फेब्रुवारी रोजी या संदर्भातली माहिती समोर आली होती. इंदुरीकर महाराजांची एक व्हिडीओ क्लीप व्हायरल झाली. ज्यात ते म्हणतात.. “सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते” या वक्तव्यावरुन फेब्रुवारी महिन्यात मोठा वाद झाला होता. इंदुरीकर यांच्यावर PCPNDT कायद्याच्या कलम २२ चं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.

त्यानुसार अहमदनगर येथील PCPNDT च्या सल्लागार समितीच्या सदस्यांनी त्यांना नोटीसही पाठवली होती. त्या नोटीशीला इंदुरीकर महाराज यांनी आपल्या वकिलांमार्फत बाजू मांडत उत्तर दिलं होतं. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या रंजना गावंदे यांनी नोटीस दिली हाती. त्यामध्ये प्रशासनाने गुन्हा दाखल न केल्यास तुम्हालाही दोषी धरण्यात येईल, असंही म्हटले होते. त्यानंतर इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment