नवी दिल्ली । भारत बायोटेकचे सहव्यवस्थापकीय संचालक सुचित्रा इला यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीने 1 मेपासून दिल्ली आणि महाराष्ट्रासह 14 राज्यांना कोविड -19 लस ‘कोव्हॅक्सिन’ थेट पुरवठा सुरू केला आहे. हैदराबादस्थित कंपनीने केंद्र सरकारने केलेल्या वाटपानुसार कोविड -19 लस पुरवठा सुरू केला आहे. इला यांनी ट्वीट केले की, “भारत बायोटेक 1 मे 2021 पासून भारत सरकारने केलेल्या वाटपाच्या आधारे या राज्य सरकारांना कोव्हॅक्सिनच्या थेट पुरवठ्याची पुष्टी करते. अन्य राज्यांकडून विनंत्याही प्राप्त झाल्या आहेत आणि आम्ही स्टॉकच्या उपलब्धतेच्या आधारे वितरण करू. ”
या राज्यात पुरवठा
ही कंपनी सध्या आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, गुजरात, जम्मू-काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, तमिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये लस पुरवित आहे.
कंपनीने किंमती कमी केल्या
29 एप्रिल रोजी कंपनीने कोव्हॅक्सिनची किंमत राज्यांसाठी प्रति डोस 400 रुपये केली होती. यापूर्वी ही किंमत प्रति डोस 600 रुपये निश्चित करण्यात आलेली होती. वास्तविक, लसीच्या किंमतीबद्दल बर्यापैकी टीका झाल्यानंतर कंपनीने किंमती कमी केल्या. भारत बायोटेक भारत सरकारला कोव्हॅक्सिनचा पुरवठा प्रति डोस 150 रुपये दराने देत आहे. 1 मेपासून 18 वर्षांवरील लोकांसाठी लसीकरण सुरू झाले आहे. ऑक्सफोर्ड-एस्ट्रोजेनकाची कोव्हिशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्फूतनिक सध्या या तीन लस उपलब्ध आहेत.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा