Covid-19: कोरोनाशी चाललेल्या लढाईत कॉर्पोरेट अमेरिका भारताला करणार मदत, नक्की काय योजना आहे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारत-केंद्रित यूएस-आधारित व्यापार (Corporate America) सेवा गटाचे प्रमुख म्हणाले की कोविड -19 (Covid-19) साथीच्या विरूद्ध लढा देण्यासाठी अमेरिकन कॉर्पोरेट क्षेत्र भारताला मदत करण्यासाठी पुढे आला आहे. भारताला सध्या कोरोना विषाणूच्या साथीच्या दुसर्‍या लाटेचा सामना करावा लागत असून गेल्या काही दिवसांपासून दररोज तीन लाखांहून अधिक संसर्गाची नवीन प्रकरणे समोर येत आहेत.

यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरमचे अध्यक्ष मुकेश अघी म्हणाले, “जीव वाचविण्यासाठी जे काही करता येईल ते करणे हाच संपूर्ण हेतू आहे.” ते पीटीआय-भाषेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “आपण असे म्हणू शकतो की आम्ही सर्व एकजुटीने गुंतलेलो आहोत. अमेरिकन कंपन्या पुढे आल्या आहेत आणि तुम्हाला दिसेल की भारत खूप वेगाने यातून सावरेल. ”

अघी म्हणाले की,” या कंपन्यांना भारताच्या परिस्थितीबद्दल चिंता आहे, कारण बहुतेक कंपन्यांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय कर्मचारी आहेत. गेल्या काही दिवसांपासून, विविध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी दररोज भारतात मदतकार्याबद्दल चर्चा करण्यासाठी आणि त्यांचे समन्वय करण्यासाठी व्हर्चुअल मिटींग्स घेत आहेत.

यादरम्यान, कोरोना संकटाशी लढा देण्यासाठी भारताला शक्य तितक्या लवकर सर्व मदत आणि संसाधने देण्यास अमेरिका तयार आहे. भारतात तयार होणारी कोरोना व्हॅक्सीन कोविशिल्डच्या (Covishield) उत्पादनासाठी अमेरिका कच्चा माल पुरवण्यासही तयार आहे. भारतातील कोरोना रूग्णांच्या चांगल्या उपचारांसाठी आणि फ्रंट लाइन कामगारांना सुरक्षित ठेवण्यासाठी अमेरिका आवश्यक पीपीई किट्स, टेटिंग किट, व्हेंटिलेटर आणि इतर गोष्टी पाठवेल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment