Covid 19: लहान मुलांना रेमडीसीव्हीर देण्याबाबत ; आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाइन्स प्रसिद्ध

corona
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पण धोका मात्र कायम आहे त्यानंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता तंज्ञानाकडून वर्तविण्यात आली आहे. मात्र तिसर्या लाटेचा धोका हा लहान मुलांना असणार आहे. असं सांगण्यात आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोविड उपचारासाठी मार्गदर्शक तत्व प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामध्ये लहान मुलांना रेमडिसिव्हिर या औषधाची शिफारस करण्यात आलेली नाही.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की “लहान मुलांसाठी रेमडीसीव्हीरची शिफारस नाही. 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये रेमडीसीव्हीरच्या संदर्भात पुरेशी सुरक्षितता आणि कार्यक्षमतेच्या डेटाचा अभाव आहे. याबरोबरच रुग्णालयात दाखल गंभीर रुग्णांसाठीच रेमडिसिवीर औषधांचा वापर केला जावा असेही स्पष्ट करण्यात आला आहे.करोनामुळे प्रकृती गंभीर असल्यास ऑक्सिजन थेरपी त्वरित सुरू केली जाणं आवश्यक आहे, द्रव आणि इलेक्ट्रोलाइट संतुलन राखले जाणं आवश्यक आहे आणि कॉर्टिकोस्टेरॉईड थेरपी सुरू केली जावी, असंही सांगण्यात आलं आहे.

स्टिरॉईड बाबत सूचना

लक्षणं नसणाऱ्या किंवा सौम्य करोना केसेसमध्ये उत्तेजक (स्टिरॉईड) धोकादायक ठरु शकतात यामुळे त्यांना केवळ रुग्णालयात दाखल गंभीर आजारी असणाऱ्या करोना रुग्णांनाच डॉक्टरांच्या देखरेखीखाली देण्यात यावं असं स्पष्ट करण्यात आलं आहे. “स्टिरॉईड योग्य वेळेवर, योग्य प्रमाणात आणि योग्य काळापुरती घेतली जावीत,” असं मार्गदर्शक तत्वात सांगण्यात आलं आहे. तज्ञांच्या मते स्टिरॉईडसर्रासपणे होणारा वापर देशात काळ्या बुरशीचा संसर्ग निर्माण होण्याचं कारण आहे. तसंच पाच वर्षांखालील मुलांना मास्क लावू नका आणि सहा ते ११ वर्षांमधील मुलांना आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मास्क घालावेत असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान यावेळी डॉक्टरांना अत्यंत गरज असेल तरच करोना पॉझिटिव्ह लहान मुलांना सीटी स्कॅनसाठी सांगण्यात यावं असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे.