नवी दिल्ली । देशात कोरोना संसर्गाची प्रकरणे कमी होत आहेत, मात्र अशीही अनेक राज्ये आहेत जिथे कोरोना रुग्णांची संख्या संथ गतीने वाढत आहे. देशात गेल्या 24 दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या 20 हजारांच्या खाली आहे. येत्या काही दिवसात कोरोना व्हायरसची परिस्थिती देखील चिंताजनक असेल कारण आहे भारतात विविध राज्यांमध्ये येणारे सण. या सणांबद्दल लोकांमध्ये खूप उत्साह आहे आणि लोकं सोशल डिस्टन्सिंग पूर्णपणे विसरून बाजारपेठेत आले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 12,514 नवीन रुग्ण आढळले आहेत तर या कालावधीत 251 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवीन कोरोना प्रकरणांच्या आगमनानंतर, भारतातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3,42,85,814 वर पोहोचली आहे तर ऍक्टिव्ह प्रकरणे 1,58,817 वर आली आहेत, जी 248 दिवसांतील सर्वात कमी आहे. सकाळी 8 वाजता अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, 251 मृत्यूंसह मृतांची संख्या 4,58,437 झाली आहे.
भारताने या वर्षी एप्रिल आणि मे मध्ये कोविड-19 ची विनाशकारी दुसरी लाट पाहिली, ज्यामध्ये वैद्यकीय सुविधा आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या दुसर्या लाटेपासून कोरोनाची प्रकरणे झपाट्याने कमी होत असतील, मात्र सणासुदीचा काळ लक्षात घेता दिवाळीनंतर रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
ती 8 राज्ये जिथे कोरोनाची वाढती प्रकरणे तिसऱ्या लाटेकडे निर्देश करत आहेत:-
केरळ: गेल्या 24 तासांत केरळमध्ये कोरोनाचे 7167 नवीन रुग्ण आढळून आले आहेत तर 167 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात नवीन रुग्ण आढळल्यानंतर बाधित रुग्णांची संख्या 49,68,657 झाली आहे. केरळमध्ये आतापर्यंत 31 हजार 681 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केरळमध्ये कोरोनाचे एकूण 79795 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर 48 लाख 57 हजार 181 लोकं बरे होऊन घरी गेले आहेत.
महाराष्ट्रात आतापर्यंत 66 लाख 11 हजार 78 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर 1 लाख 40 हजार 216 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या एका दिवसाबद्दल बोलायचे झाले तर महाराष्ट्रात कोरोनाचे 1172 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात अद्याप 20 हजार 277 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर 64 लाख 50 हजार 585 नवीन रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
तामिळनाडू: तामिळनाडूमध्ये गेल्या एका दिवसात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 1,009 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आणि महामारीमुळे 19 रुग्णांचा मृत्यू झाला. रविवारी आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले की, यासह संसर्गाची एकूण प्रकरणे 27,02,623 वर पोहोचली असून मृतांची संख्या 36,116 वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात सध्या कोविड-19 चे 11,492 रुग्ण उपचार घेत आहेत. तामिळनाडूमध्ये आतापर्यंत 26,55,015 लोक कोरोनामुळे बरे झाले आहेत.
पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेनंतर कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 914 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, गेल्या एका दिवसाच्या आकडेवारीपेक्षा ही संख्या 66 कमी आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत नोंदवलेल्या कोविड-19 प्रकरणांपैकी कोलकात्यात सर्वाधिक 274 रुग्णांची नोंद झाली आहे, त्यानंतर शेजारच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात 144 प्रकरणे आहेत. नवीन प्रकरणे आल्यानंतर राज्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 15 लाख 92 हजार 908 वर गेली आहे, तर आतापर्यंत 19,141 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात अजूनही 8296 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
ओडिशा: ओडिशातील कोरोनाची प्रकरणे पूर्वीच्या तुलनेत किंचित वाढली आहेत. गेल्या 24 तासात कोरोनाचे 488 नवीन रुग्ण आढळून आले असून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे नवीन रुग्ण आल्यानंतर एकूण बाधित रुग्णांची संख्या 10 लाख 41 हजार 457 झाली आहे. ओडिशातील मृतांचा आकडा 8333 वर पोहोचला आहे. 4427 रुग्णांवर अजूनही ओडिशाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आंध्र प्रदेश: आंध्र प्रदेशमध्ये कोविड-19 चे 385 नवीन रुग्ण आढळले आहेत, त्यानंतर एकूण संक्रमितांची संख्या 20,66,450 झाली आहे. त्याचवेळी, आणखी चार जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 14,373 वर पोहोचला आहे. त्याच वेळी, 675 लोकं बरे झाल्यानंतर एकूण संसर्गमुक्त लोकांची संख्या 20.47 लाख झाली आहे. आता येथे 4,355 रुग्ण उपचार घेत आहेत. सरकारी बुलेटिननुसार, रविवारी सकाळी 9 वाजेपर्यंत गेल्या 24 तासात पूर्व गोदावरी जिल्ह्यात संसर्गाची सर्वाधिक 87 प्रकरणे नोंदली गेली आहेत.
कर्नाटक: कर्नाटकात रविवारी कोरोना विषाणूच्या संसर्गाची 297 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आणि साथीच्या आजारामुळे सात लोकांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, या नवीन प्रकरणांच्या आगमनानंतर, एकूण संक्रमित लोकांची संख्या 29,88,333 झाली आहे आणि मृतांची संख्या 38,082 वर पोहोचली आहे. विभागानुसार, रविवारी 345 रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत 29,41,578 रुग्ण बरे झाले आहेत. विभागानुसार, बेंगळुरू अर्बनमधून 137 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. शहरात 204 रुग्ण बरे झाले तर सात रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. विभागानुसार, राज्यात सध्या 8,644 कोविड-19 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आसाम: मागील दिवसांच्या तुलनेत आसाममध्येही कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत. आसाममध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 212 नवीन रुग्ण आढळून आले आहेत, तर 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्ण आढळल्याने राज्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 6 लाख 10 हजार 645 वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत 5997 रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यात अद्यापही 3674 कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.