Coronavirus Vaccine बाबत सीरम इन्स्टिट्यूट म्हणते,” डिसेंबरपर्यंत येऊ शकते Vaccine”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । या वर्षाच्या अखेरीस कोरोनाव्हायरसवरील लस बाजारात उपलब्ध होईल असा दावा पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केला आहे. याव्यतिरिक्त, कंपनी येत्या दोन महिन्यांत या लसीची किंमत देखील जाहीर करेल. सीरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे आणि ते कोविशील्ड (Covishield) नावाने लस भारतात आणणार आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी ही लस विकसित केली आहे आणि ते तयार करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटने अ‍ॅस्ट्रॅजेनेका फार्मा (AstraZeneca) कंपनीशी करार केला आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर् पूनावाला म्हणाले, “आम्हाला आशा आहे की या वर्षाच्या अखेरीस कोरोना विषाणूवरील लस मिळेल.तसेच येत्या दोन महिन्यांत आम्ही या लसीची किंमतही जाहीर करू.”

ऑगस्टच्या अखेरीस ही लस तयार केली जाईल
ते म्हणाले की आम्ही ICMRच्या मदतीने भारतातील हजारो रुग्णांवर या लसीची चाचणी करणार आहोत. ऑगस्टच्या अखेरीस या लसीचे उत्पादन सुरू होईल. मला खात्री आहे की या लसीची चाचणी यशस्वी होईल. कंपनी कोविशील्ड (Covishield) आणि नोव्हाव्हॅक्स (Novavax) या नावाने कोरोना विषाणूची लस भारतात लॉन्च करणार आहे.

लसीची किंमत किती असेल
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना व्हायरस लसीच्या 100 दशलक्ष डोसच्या उत्पादनासाठी बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन आणि गावीं यांच्याशी करार केला आहे. या अंतर्गत कंपनी कोरोना विषाणूच्या लसीचा एक डोस भारतासह इतर गरीब आणि विकसनशील देशांना 225 रुपये किंवा 3 डॉलरमध्ये देईल. परंतु लसीची नेमकी किंमत हि येत्या दोन महिन्यांनंतरच निश्चित केली जाईल.

या दिवसांत कोरोना व्हायरस वरील लस तयार करण्यासाठी 200 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्सवर जगभरात काम सुरू आहेत. यातील 21 पेक्षा जास्त लसी या क्लिनिकल चाचण्यांमध्ये आहेत. ही लस मानवी चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. जर ही चाचणी यशस्वी झाली तर 2021 पर्यंत जगात कोरोनाची लस उपलब्ध होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment