देशात लवकरच 4 लसींचं वैद्यकीय परीक्षण घेतलं जाणार- केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या जगभरातील कोरोना बाधित देशांच्या यादीत भारत दहाव्या स्थानावर पोहोचला आहे. अशातच देशात 14 ठिकाणी कोरोनाविरोधातील लस शोधण्याचं काम सुरू असून त्यापैकी 4 लसींचं लवकरच वैद्यकीय परीक्षण (क्लिनिकल ट्रायल) घेतलं जाणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.

भाजपा नेते जी. व्ही. एल. नरसिम्हा राव यांच्या सोशल मीडियावरून साधलेल्या ऑनलाईन संवादात बोलताना आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, ‘संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या महामारी रोखण्यासाठी लस विकसित करत आहे. लस तयार करण्यासाठी 100 हून अधिक जण काम करत असून विविध टप्प्यांवर काम केलं जात आहे. जागतिक आरोग्य संघटना या प्रयत्नांसाठी मदत करत आहे. ‘भारतातही कोरोनावर लस शोधण्याचे प्रयत्न सुरु असून अनेक वैज्ञानिक सक्रियरित्या काम करत आहेत. आपल्या देशात 14 ठिकाणी काम सुरु असून विविध टप्प्यांमध्ये हे संशोधन केलं जात आहे.’ असंही डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले की, ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा जैव तंत्रज्ञान विभाग नियामक मंजुरी, अनुदान आणि आर्थिक अशा प्रकारे मदत करत आहे. तसेच जे कोणी लस शोधण्यासाठी काम करत आहेत. त्यांना आर्थिक मदत आणि नियमांनुसार, परवानगी देण्यात येणार आहे. 14 ठिकाणी कोरोनाविरोधातील लस शोधण्याचं काम सुरू असून त्यापैकी 4 लसींचं लवकरच क्लिनिकल ट्रायल घेतलं जाणार आहे.’ अशी माहिती त्यांनी डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment