मुंबई । कोरोनाच्या संसर्गावर देखरेख ठेवणारी अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील शास्त्रज्ञ स्टीव हँक यांनी भारताला सडलेला सफरचंद असे संबोधले आहे. भारत करत असलेल्या कोरोनाच्या उपाययोजनांवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रा. स्टीव हँक यांनी ट्विटरवर भारतासह व्हेनेझुएला, इजिप्त, सीरिया, येमेन, तुर्की आणि चीनवर टीका केली आहे. हे पाचही देश कोरोना संसर्गाच्या डेटाबाबत ‘सडलेले सफरचंद’ असल्याची टीका त्यांनी केली आहे.
हे देश कोरोनाशी संबंधित आकडेवारी माहिती देत नाहीत अथवा संशयित आकडेवारी देत आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये विद्यापीठाच्या आकडेवारीचा ग्राफच शेअर केला आहे. त्यामध्ये भारतासह अन्य ५ देशांना प्रा. स्टीव हँक यांनी सडलेला सफरचंद म्हटले आहे. भारतात फार कमी प्रमाणावर कोरोनाची चाचणी होत असून इटलीसारखी परिस्थिती उद्भवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. याआधीदेखील हँक यांनी भारत कोरोनाविरोधात करत असलेल्या उपाययोजनांवरही त्यांनी टीका केली होती.
These countries are the “rotten apples” of #coronavirus data. These countries either do not report #covid data or are reporting highly suspicious data. pic.twitter.com/tgEANm77fg
— Prof. Steve Hanke (@steve_hanke) June 9, 2020
दरम्यान, भारतात कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत ११ हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर मृत्यूचा आकडा धडकी भरवणारा आहे. त्यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे. भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. असेच आकडे वाढत राहिले तर भारत चौथा क्रमांकही मागे टाकेल अशी शक्यता आहे. देशात कोरोना व्हायरसच्या संसर्गाची संख्या ३ लाखांच्या पुढे गेली आहे. जूनच्या पहिल्या दिवसापासून, दररोज सरासरी सुमारे १० हजार प्रकरणे नोंदविली जात आहेत. शनिवारी गेल्या २४ तासांत ११ हजारापेक्षा जास्त संसर्ग झाल्याची घटना घडली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”