नर्सनं PPE किटवर मेसेज लिहून केलं प्रपोज; कोरोना कोमात अन् Love स्टोरी जोमात

0
48
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेले वर्षभर कोरोना महामारीने जगभर थैमान घातले आहे. न भूतो न भविष्य अशा या विषाणूने जगभर हाहाकार केला होता. सध्या ती परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आली असली तरी तेव्हाची परिस्थिती भयानक होती. कोरोनाचा फटका प्रेमी युगुलाना देखील बसला. लॉक डाउन मुळे आपल्या प्रिय व्यक्तीचा विरह त्यांना सहन करावा लागत आहे. या लॉकडाऊनमुळे काहींची लग्न लांबणीवर पडली. काहींनी एकमेकांना प्रपोज करण्याचं पुढे ढकललं. परंतु अस म्हणतात की खऱ्या प्रेमाला नेहमी मार्ग मिळतो . COVID 19 च्या वॉर्डात काम करणाऱ्या एका पुरुष नर्सच्या उदाहरणावरुन हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

इटलीतील एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या या नर्सचं अनोखं प्रपोजल सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे. इटलीच्या दक्षिण भागातील हे हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमधील Giuseppe Pungente या नर्सनं पीपीई (PPE) किटच्या पाठिमागच्या बाजूला  गर्लफ्रेंडला प्रपोज करणारा मजकूर लिहिला होता. ते PPE किट घालून तो हॉस्पिटलमधील CCTV समोर उभा राहिला.

कार्मेली, तू माझ्याशी लग्न करशील का?’’ असा त्यानं इटालियन भाषेत लिहिलेल्या मजकुराचा अर्थ आहे. त्याचबरोबर त्यानं कार्मेलीला उत्तर देण्यासाठी ‘हो’ आणि ‘नाही’ असे दोन पर्याय देखील दिले आहेत. त्याची ही पोस्ट आता चांगलीच व्हायरल झाली असून त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here