औरंगाबाद: महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहत आहे. उपचार यंत्रणा कमी पडू नये म्हणून कोरोना रुग्णांसाठी नवीन 5 हजार बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे.अशी माहिती मनपा प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.
गेल्या काही दिवसात शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोना संसर्ग हा घराघरात पोहचला आहे.घरातील एक सदस्य बाधित आढळून आल्यानंतर घरातील इतर सदस्यांनी कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट मध्ये ते देखील बाधित निघत असल्याचे आढळून आले आहे. दररोज साधारणपणे आरटीपीसीआर आणि रॅपिड अॅण्टिजेनच्या दोन हजारापेक्षा अधिक चाचण्या होत आहे. काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह रेट 12 टक्के एवढा होता. आता तर दररोज सुमारे सहाशे रुग्ण आढळत आहे. यामुळे पॉझिटिव्ह रेट 17 टक्क्यांवर पोहोचला आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता मनपा रुग्णांकरिता 5 हजार नवीन बेडची व्यवस्था करणार आहे.
————–
मोबाईल ॲप चा जास्तीतजास्त वापर करावा
कोरोना चा प्रादुर्भाव लक्षात घेता लोकांमध्ये जनजागृती व्हावी यादृष्टीने एम एच एम एच ह्या अँप द्वारे नागरिकां मध्ये उपलब्ध बेड ची माहिती प्राप्त होणार आहे. या अँप चा जास्तीत जास्त वापर लोकांनी करावा असे आवाहन देखील प्रशासकांनी केले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group