समाजाचं देणं फेडण्याची मिळाली संधी; कोरोनामुक्त झाल्यावर प्रिया बापटने केले रक्तदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेइंडस्ट्रीतील क्यूट कपल अर्थातच अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट या जोडीला कोण ओळखत नाही. या दोघांवरही प्रेक्षकांनी नेहमीच भरभरून प्रेम केले आहे. काही दिवसांपूर्वी प्रिया बरोबरच उमेशलाही कोरोनाची लागण झाली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांनी याविषयी माहिती दिली होती. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ते आपल्या घरातच क्वारंटाईन होते. त्यानंतर योग्य त्या उपचारानंतर दोघेही कोरोनमुक्त झाल्याची गुडन्यूज त्यांनी सोशल मीडियावरूनच दिली होती. त्यानंतर आता प्रियाची एक सकारात्मक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. तिने नुकतेच रक्तदान केले आहे आणि त्याबाबत माहिती देताना एक पोस्ट लिहिली आहे.

https://www.instagram.com/p/COsZs_ThRTp/?utm_source=ig_web_copy_link

गेल्या काही दिवसांमध्ये अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली. मात्र वेळीच योग्य उपचार घेऊन ते बरेही होत आहेत. तसेच हे कलाकार आपल्याला शक्य आहे तशी मदत करताना दिसत आहेत. अश्याप्रकारे कोरोना काळात ख-या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडत आहे. नुकतेच अभिनेत्री प्रिया बापटनेही तिच्या आयुष्यात आजपर्यंत केले नव्हते ते काम केले आहे. आजपर्यंत प्रियाने सुईची भीती वाटते म्हणून कधीच रक्तदान केले नव्हते. मात्र पहिल्यांदाच मनात कोणतीही भीती न ठेवता तिने रक्तदान केल्याचा आनंद चाहत्यांसह शेअर केला आहे. रक्तदान केल्यानंतर तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ज्यात तिने आपला आनंद व्यक्त करत एक वेगळेच समाधान मिळाल्याचे सांगितले आहे.

https://www.instagram.com/tv/CNCsPYVHkCX/?utm_source=ig_web_copy_link

ती म्हणाली, मी आज रक्तदान करण्यासाठी पात्र आहे. म्हणून आज समाजाचे देणे फेडण्याची हि संधी मी सोडू इच्छित नाही. आज पहिल्यांदा रक्तदान केल्यानंतर किमान एक जीव वाचवण्यासाठी मी जे काही करू शकते ते केलं, आता मला शांत झोप लागणार. रक्तदान हे महादान आहे त्यामुळे प्रिया बापटची ही पोस्ट पाहून इतरांनाही रक्तदान करण्यासाठी प्रेरणा मिळणार हे नक्की. एकंदर काय तर कोरोनाने केवळ शिकवलेच नाही तर माणुसकीने वागायला भागही पाडले.

Leave a Comment