गर्भवती महिलांसाठी 50 खाटांचे तर बालकांसाठी 100 खाटांचे कोविड रुग्णालय उभारणार

corona
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद |  गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने जगभरात कहर केला आहे. तब्बल तीन महिने संपूर्ण भारत देश लॉकडाऊन होता. त्यामुळे आर्थिक देशाचे नुकसान झाले. आता पुन्हा हे संकट देशभरावर येऊन ठेपले आहे. पुढे हि कोरोनाची तिसरी लाट येण्याची श्यक्यता वर्तवली जात आहे.

कोरोनाची दुसरी लाट समाप्त होण्या आधीच कोरोनाची तिसरी लाट येणार असे आरोग्य विभागाकडून वारंवार अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मात्र लहान मुलांना मोठ्या प्रमाणात धोक्याची शक्यता वर्तवली जात असून राज्यात लहान मुलांच्या सुरक्षेसाठी गतीने हालचाली सुरू झाल्या आहेत .

आगामी धोका लक्षात घेता औरंगाबाद शहरात महानगरपालिका लहान मुलांसाठी 100 खाटांचे बाल कोविड सेंटर सुरू करणार असून गरोदर महिलांसाठी 50 खाटांचे गर्भवती कोविड रुग्णालय सुरू करत आहे. बालरोग तज्ज्ञांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून बालकांसंदर्भात वेळीच नियोजन केल्यास कोरोणाचा घातक परिणाम होणार नाही त्यामुळे हालचालींना वेग देण्यात आला आहे.