नवी दिल्ली । देशात कोरोना विषाणूचा फैलाव थांबताना दिसत नसताना दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोना बळींची संख्या वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये देशात ८६ हजार ०५२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून १ हजार १४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांच्या एकून संख्येनं ५८ लाख १८ हजार ५७१ वर पोहोचली आहे. देशात सध्या ९ लाख ७० हजार ११६ रूग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत ४७ लाख ५६ हजार १६५ जणांनी करोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत ९२हजार २९० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
याशिवाय देशातील कोरोनाच्या चाचण्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येत आहे. गेल्या २४ तासांत देशात १३ लाखांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या आहे. दिवसभरात १३ लाख ८० हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.