देशात गेल्या २४ तासांत २८ हजार ४९८ नवे रुग्ण; कोरोनाग्रस्तांच्या संख्येनं गाठला ९ लाखांचा टप्पा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । संपूर्ण जगात कोरोना महामारीने थैमान घातलं आहे. भारतात सुद्धा या महामारीनं रौद्र रूप धारण केलं आहे. देशभरातील कोरोनाबाधितांची संख्येने आता ९ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील २४ तासांत २८ हजार ४९८ नवे रुग्ण आढळले असून, ५५३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या आता ९ लाख ६ हजार ७५२ वर पोहचली आहे. यामध्ये अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या ३ लाख ११ हजार ५६५ असून, आतापर्यंत ५ लाख ७१ हजार ४६० जणांनी करोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत देशभरात २३ हजार ७२७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशीही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

याशिवाय १३ जुलैपर्यंत देशभरात १ कोटी २० लाख ९२ हजार ५०३ नमूण्यांची तपासणी केली गेली आहे. यातील २ लाख ८६ हजार २४७ नमूने काल(सोमवार) तपासण्यात आले असल्याची माहिती ‘आयसीएमआर’ कडून देण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment