व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाच्या संकटात डॉक्टरांना प्रोत्साहन; ठाकरे सरकारने केली मानधनात वाढ

मुंबई । कोरोनाच्या लढ्यात सर्वात आघाडीवर लढणाऱ्या डॉक्टरांच्या कामाची दखल घेत राज्य सरकारनं त्यांच्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने बंधपत्रित (बॉण्डेड) डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचसोबत बॉण्डेड डॉक्टर आणि कंत्राटी डॉक्टर यांचे मानधनही समान केले जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे. डॉक्टरांच्या मानधनात वाढ केल्यामुळे कोरोना लढाईत यश मिळेल, तसंच डॉक्टरांनाही प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

वाढीव मानधनानुसार आता आदिवासी भागातील बंधपत्रित डॉक्टरांना ६० हजारांच्याऐवजी ७५ हजार रुपये, तसंच आदिवासी भागातील बंधपत्रित तज्ज्ञ डॉक्टरांना ७० हजारांऐवजी ८५ हजार रुपयांचं मानधन मिळेल. इतर भागातील एमबीबीएस डॉक्टरांना ५५ हजारांऐवजी ७० हजार रुपयांचं मानधन मिळेल. तसंच इतर भागातील तज्ज्ञ डॉक्टरांना ६५ हजारांऐवजी ८० हजार रुपये मानधन देण्यात येईल. राज्य सरकारच्या मानधन वाढ करण्याच्या निर्णयामुळे कोरोनाशी धैर्यानं मुकाबला करणाऱ्या डॉक्टरांचे मनोबल नक्की वाढणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”