महागाईच्या वाढत्या झळांमध्ये आता दूधाच्या दरवाढीचा नवा फटका बसणार आहे. गायीच्या आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रत्येकी २ रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली आहे, त्यामुळे गायीचे दूध ५६ वरून ५८ रुपये आणि म्हशीचे दूध ७२ वरून ७४ इतके महाग होणार आहे.
कात्रज डेअरीच्या बैठकीत निर्णय
ही दरवाढ पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (कात्रज डेअरी) येथे झालेल्या दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभेत एकमताने निश्चित करण्यात आली.
दरवाढीमागचे कारण काय?
दूध उत्पादन खर्च वाढल्याने उत्पादकांवर ताण वाढला आहे.
पशुखाद्य, वाहतूक आणि अन्य उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे.
शेतकरी व दूध उत्पादकांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचे संघटनेचे मत.
सर्वसामान्यांवर होणारा परिणाम
घरगुती खर्च वाढणार – चहा, कॉफी आणि दुधाचे पदार्थ महागणार.
हॉटेल व्यवसायावर परिणाम – चहा, दुधाचे पदार्थ आणि मिठाईच्या किमती वाढण्याची शक्यता.
दूध उत्पादकांना फायदा? – उत्पादकांच्या दृष्टीने हा दिलासा असला, तरी ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार.