हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Credit Card Rules) बँका आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे क्रेडिट कार्ड जारी करून देतात. ज्यामध्ये आपल्याला निश्चित खर्चासाठी लिमिट दिला जातो. त्यामुळे आजकाल प्रत्येकाकडे क्रेडिट कार्ड असतं. परिणामी, क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शॉपिंग करणे हा एक ट्रेंड झाला आहे. कारण क्रेडिट कार्डचा वापर सोपा आणि फायदेशीर असल्याचे सगळ्यांनाच ठाऊक आहे. अशातच आता येस बँकेने क्रेडिट कार्ड वापरण्याचे नियम बदलले आहेत. तुमच्याकडे येस बँकेचे क्रेडिट कार्ड असेल तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
डोमेस्टिक लाउंज एक्सेसच्या नियमांत बदल (Credit Card Rules)
एका वृत्तानुसार, येस बँकेकडून (Yes Bank) आपल्या डोमेस्टिक लाउंज एक्सेसचा लाभ घेण्यासाठीचे नियम बदलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या बँकेने सांगितल्याप्रमाणे, आता त्यांच्या सर्व क्रेडिट कार्ड धारकांना पुढील तिमाहीमध्ये लाउंज प्रवेश घ्यायचा असेल तर चालू तिमाहीत किमान १०,००० रुपये मोजावे लागणार आहेत. यामध्ये खाणं- पिणं, वायफाय सुविधा, आंघोळीसाठी आणि विश्रांतीसाठी विमानतळ लाउंज प्रवेश असे फायदे दिले जाणार आहेत.
कधीपासून बदलणार नियम?
येस बँकेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या देशांतर्गत लाउंज प्रवेश लाभांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. हे नियम त्यांच्या सर्व क्रेडिट कार्ड धारकांसाठी येत्या १ एप्रिल २०२४ पासून लागू होणार आहेत. त्यामुळे येस बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना येत्या १ एप्रिलपासून बदललेल्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. (Credit Card Rules)
क्रेडिट कार्डमार्फत लाउंज प्रवेशाचा लाभ घेण्याशी संबंधित खर्च समजून घेत यापुढे बँका मूलभूत क्रेडिट कार्ड धारकांना हा मोफत लाभ देणार नाहीत, असेही सांगण्यात आले आहे. हा नियम १ एप्रिलपासून लागू होणार असल्याने ग्राहकांना एप्रिल/मे/जून २०२४ मध्ये लाभ मिळविण्यासाठी २१ डिसेंबर २०२३ – २० मार्च २०२४ या तिमाहीत आवश्यक तो खर्च करावा लागणार आहे.
का बदलले नियम?
येस बँकेच्या क्रेडिट कार्डावर येत्या १ एप्रिल २०२४ पासून नवीन लाउंज प्रवेश नियम लागू केले जाणार आहेत. त्यामुळे आता येस बँकेच्या क्रेडटि कार्ड धारकांना त्यांच्या कार्डावरील लाउंज प्रवेशाचा लाभ घेण्यासाठी दर तिमाहीत किमान १०,००० रुपये खर्च करावा लागणार. (Credit Card Rules) यामुळे, बँक किमान लाउंज प्रवेशाचा (Domestic) खर्च कव्हर करू शकेल. हा नियम बदलण्याचे हेच मुख्य कारण आहे.
बदललेल्या नियमांचा कोणत्या कार्डधारकांना फटका बसणार?
येस बँकेने क्रेडिट कार्डसंदर्भात बदललेल्या नियमांचा इतर कार्ड धारकांवर देखील परिणाम होणार आहे. यामध्ये
येस मार्की (प्रति तिमाही ६ मोफत लाउंज भेट),
येस सिलेक्ट (पूर्वीचे येस प्रॉस्पेरिटी एज) (प्रति तिमाही १ विनामूल्य लाउंज भेट),
येस रिझर्व्ह (पूर्वी येस फर्स्ट एक्सक्लुझिव्ह), (प्रति तिमाही ३ विनामूल्य लाउंज भेट),
येस फर्स्ट प्रीफर्ड (प्रति तिमाही २ विनामूल्य लाउंज भेट),
येस बँक एलिट (पूर्वीचे येस प्रिमिया) (प्रति तिमाही २ मोफत लाउंज भेटी) या कार्डांचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर बदलेल्या नियमांचा BYOC (प्रति तिमाही १ विनामूल्य लाउंज भेट) आणि येस वेलनेस प्लस (प्रति तिमाही २ मोफत लाउंज भेटी) या कार्डांवरही परिणाम होताना दिसेल.
शेअर्समध्ये वाढ
(Credit Card Rules) भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) एचडीएफसी (HDFC) बँक समूहाला येस (Yes) बँकेतील त्यांचा हिस्सा ९.५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मंजुरी मिळाली आहे. ज्यामुळे मंगळवारी ६ फेब्रुवारी रोजी येस बँकेच्या शेअर्समध्ये एकूण १३ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. या तेजीनंतर येस बँकेचे शेअर्स २५.७० रुपयांवर येऊन पोहोचला आहे.