भारतीय क्रिकेटपटूंना दिलासा ! खेळाडूंच्या पगारात वाढ BCCI नं केले जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कोरोना व्हायरसचा गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगाला फटका बसला आहे. क्रिकेट विश्वालाही याचा मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे मागील वर्षातील बराच काळ क्रिकेट बंद होते. यानंतर हळूहळू आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली. या कोरोनामुळे देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. रणजी ट्रॉफीचा देखील मागचा सिझन स्थगित करण्यात आला होता.

देशांतर्गत क्रिकेट बंद असल्यानं त्यावर अवलंबून असणाऱ्या क्रिकेटपटूंना अडचणीचा सामना करावा लागत होता. या क्रिकेटपटूंना आता बीसीसीआयकडून दिलासा देण्यात आला आहे. या खेळाडूंच्या पगारात वाढ करण्यात आली असल्याचे बीसीसीआयनं जाहीर केले आहे. बीसीसीआयच्या सर्वोच्च कौन्सिलच्या बैठकीमध्ये खेळाडूंच्या मॅच फिसमध्ये वाढ करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्याकडून हि माहिती देण्यात आली आहे. बीसीसीआयच्या नव्या वेतनपद्धतीनुसार 40 पेक्षा जास्त मॅच खेळलेल्या खेळाडूंना 60 हजार रूपये, 23 वर्षांखालील क्रिकेटपटूंना 25 हजार तर 19 वर्षांच्या खालील क्रिकेटपटूंना 20 हजार रुपये मॅच फिस देण्यात येणार असल्याची घोषणा जय शहा यांनी केली आहे. तसेच जे क्रिकेटपटू 2019-20 साली झालेल्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांना 2020-21 चा सिझन रद्द झाल्यानं नुकसान भरपाई म्हणून 50 टक्के मॅच फिस देण्यात येणार असल्याचं जय शहा यांनी जाहीर केले आहे.

Leave a Comment