बर्थ डे स्पेशल :सचिनच्या आयुष्यातील ५ संस्मरणीय खेळी,ज्यामुळे भारतीय क्रिकेटचा चेहरामोहराच बदलला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक काळ असा होता की भारतीय क्रिकेटला सचिन तेंडुलकरच्या नावाने ओळखले जात असे.टीम इंडियाच्या सामन्यादरम्यान मैदानात अक्षरशः सचिन सचिन अशा घोषणा ऐकू येत असे…. असे वाटायचे की तर,टीम इंडिया नाही केवळ सचिनच खेळत आहे.तो आऊट झाल्यानंतर तर भारतीय प्रेक्षक मैदान सोडत असत आणि मग घरातच सामना पाहणारे चाहते दूरदर्शन टीव्ही बंद करत असत.यामुळेच आजही भारतीय सचिनला क्रिकेटचा देव मानतात.

आज २४ एप्रिल म्हणजे आपल्या याच क्रिकेटच्या देवतेचा वाढदिवस आहे.अशा परिस्थितीत त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सचिनच्या अशा काही खास खेळींची आठवण करुन देत आहोत.जेव्हा मैदानात उपस्थित चाहते सचिन-सचिनचा जयजयकार करायचे तेव्हा सचिन मैदानात सर्वत्र चौकार आणि षटकार ठोकत असत.

On Sachin Tendulkar's 47th Birthday: A look at his 47 greatest ...

शारजामध्ये वाळूच्या वादळामध्ये तेंडुलकरची धमाल
२२ एप्रिल १९९८ रोजी कोका-कोला चषक सामन्यात शारजा क्रिकेट मैदानावर सचिनने ऑस्ट्रेलियाविरुध्द १३१ चेंडूंचा सामना करत वादळी १४३ धावा काढल्या होत्या,मात्र असे असूनही भारतीय संघाला या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.सचिनच्या या खेळीने टीम इंडियाने या चषकातील अंतिम फेरी गाठण्यात यश मिळविले.आपल्या या खेळीत सचिनने ६ चौकार व ५ षटकार लगावले होते.

April 22, 1998: When Sachin Tendulkar summoned 'Desert Storm' vs ...

वाढदिवशी झळकालेले ‘शतक’
२४ एप्रिल १९९८ रोजी त्याच्या २५ व्या वाढदिवशी सचिनने पुन्हा एकदा शारज्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध १३४ धावांचा अविस्मरणीय डाव खेळला. या शतकात सचिनने १३ चौकार आणि ३ षटकार लगावले.सचिनने कांगारू गोलंदाजांना अक्षरशःपिंजून काढले आणि मैदानातील चारही बाजूंना त्याने धावा केल्या.त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ सोबतच ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’हा पुरस्कारही देण्यात आला.

A look back at Sachin Tendulkar's ethereal 98 against Pakistan in ...

२००३च्या विश्वचषकात पाकिस्तानच्या स्वप्नांवर पाणी फेरले
२००३ च्या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध सेंच्युरियन येथे झालेल्या सामन्यात २ षटकार आणि १२ चौकारांच्या मदतीने ७५ चेंडूंत ९८ धावा करत सामना भारताच्या बाजूने झुकविला.सचिनच्या या तुफानी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने ६ विकेट गमावून २७४ धावांचे लक्ष्य आरामात गाठले होते.या खेळीनंतर सचिन या स्पर्धेत ‘मॅन ऑफ द मॅच’ बरोबरच ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ बनला होता.त्यानंतर मात्र टीम इंडिया अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला.

Sachin Tendulkar, Rahul Dravid destroy New Zealand with glorious ...

हैदराबादमध्ये किवी गोलंदाजांवर तुटून पडला सचिन
हैदराबादमध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्याने २० चौकार आणि ६ षटकारांनी सजवलेल्या १५० चेंडूत १८६ धावा केल्या. या सामन्यात भारताने सचिनच्या १८६ आणि राहुल द्रविडच्या १५३ धावा (१५३ चेंडूत १५ चौकार आणि २ षटकार) च्या मदतीने ३७६ धावा केलेल्या.न्यूझीलंड मात्र २०२ धावांवर बाद झाला आणि भारताने हा १७३ धावांनी सामना जिंकला.या सामन्यातही सचिनला ‘मॅन ऑफ द मॅच’ घोषित करण्यात आले.

BBC Sport - Cricket - Sachin Tendulkar fires record 200 against ...

सचिनने झळकावले एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले पहिले द्विशतक
२४ फेब्रुवारी २०१० रोजी, ग्वाल्हेरमध्ये मास्टर-ब्लास्टरने आणखी एक कारनामा केला.दक्षिण आफ्रिकेविरूद्ध त्याने वन डे क्रिकेट च्या इतिहासातील पहिले दुहेरी शतक झळकावले. त्याने १४७ चेंडूत २०० धावा केल्या. हा सामना भारताने १५३ धावांनी जिंकला. वयाच्या ३७ व्या वर्षी त्याने ही कामगिरी केली. या खेळीचे वर्णन सचिनने एक आठवणीतील खेळी असे केले आहे.मात्र, त्यानंतर सचिनचा विक्रम त्याच्याच संघाचे सहकारी वीरेंद्र सेहवाग आणि नंतर रोहित शर्मा यांच्यासह आणखीही काही फलंदाजांनी दुहेरी शतके ठोकली.ज्यामध्ये रोहितने वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक दुहेरी शतके ठोकण्याचा मान मिळविला आहे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment