डॉन ब्रॅडमन यांना ० धावांवर बाद करून १००च्या कसोटी धावांच्या सरासरीला ब्रेक लावणारा ‘तो’ गोलंदाज कोण होता जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ५ जून … क्रिकेटच्या इतिहासात ही तारीख खूप महत्वाची आहे कारण या दिवशी जन्मलेल्या एका गोलंदाजाने आपल्या कारकीर्दीत २३२३ विकेट घेतल्या परंतु केवळ एका विकेटमुळे तो क्रिकेट इतिहासात आजरामर झाला. तो खेळाडू आहे इंग्लंडचा माजी लेगस्पिनर एरिक हॉलिस, ज्यांची आज १०८ वी जयंती आहे.

एरिक हॉलिस लेगस्पिनर होते ज्यांनी १९३५ मध्ये इंग्लंड संघाकडून पदार्पण केले होते. हॉलिसने आपल्या पूर्ण कारकीर्दीत फक्त १३ कसोटी सामनेच खेळले आणि ४४ विकेट्स घेतल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा काउन्टी क्रिकेटमध्ये हॉलिस अधिक प्रसिद्ध होते. वारविक्शायरच्या या अनुभवी खेळाडूने एकूण ५१४ प्रथम श्रेणी सामन्यांत केवळ २०.९४ च्या सरासरीने २३२३ विकेट्स घेतल्या, त्यामध्ये त्याने १८२ डावात पाच विकेट आणि ४० सामन्यांत १० गडी बाद केले.

एरिक हॉलिसने आपल्या कारकीर्दीत नक्कीच २३२३ विकेट्स घेतल्या असतील मात्र १९४८ मध्ये खेळल्या गेलेल्या ओव्हल टेस्टसाठी त्याला जास्त ओळखले जाते. कारण क्रिकेटचा महान फलंदाज डॉन ब्रॅडमनचा हा शेवटचा सामना होता आणि कसोटी क्रिकेटमधील १०० धावांची सरासरी पूर्ण करण्यासाठी त्याला केवळ ४ धावाच करायच्या होत्या. मात्र हॉलिसच्या गुगलीने दुसऱ्याच बॉलवर ब्रॅडमनला क्लीन बोल्ड केले आणि त्याची कसोटी कारकीर्द ९९.९४ च्या सरासरीने संपली. या सामन्यात ब्रॅडमन दुसर्‍या डावात फलंदाजी करू शकला नाही कारण ऑस्ट्रेलियाने हा सामना एका डावाने जिंकला होता.

ब्रॅडमनला १०० च्या सरासरी करण्यापासून रोखल्यानंतरही हॉलिसची कारकीर्द फार काळ टिकली नाही. ओव्हल कसोटीनंतर हॉलिस आणखी फक्त ६ सामनेच खेळू शकला. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध दोन आणि न्यूझीलंडविरुद्ध चार कसोटी सामने खेळले. भलेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॉलिसची कारकीर्द कदाचित १३ कसोटी सामन्यांपुरती मर्यादित राहिली असेल, मात्र वारविक्शायरसाठी खेळताना त्याने १९ पैकी १४ काऊन्टी हंगामात १०० हून अधिक बळी मिळवले,जो कि एक विक्रमच आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment