भारत आणि इंग्लंड यांच्यामधील मालिका कोण जिंकणार ? राहुल द्रविडने वर्तवली ‘हि’ भविष्यवाणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या दौऱ्यासाठी शुक्रवारी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडियाची घोषणा होताच ही मालिका कोण जिंकणार? यावर सध्या चर्चा सुरु झाली आहे. तेव्हा या मालिकेवर भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड यांनी आपला अंदाज व्यक्त केला आहे. 2007 साली भारताने राहुल द्रविडच्या नेतृत्त्वाखाली इंग्लंड विरुद्ध शेवटची कसोटी मालिका जिंकली होती.

काय म्हणाला राहुल द्रविड?
टीम इंडिया ही मालिका 3-2ने जिंकेल असा विश्वास राहुल द्रविड यांनी व्यक्त केला आहे. “माझ्या मते यंदा भारताला सर्वोत्तम संधी आहे. भारतीय टीम या मालिकेसाठी सज्ज असेल. ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका जिंकल्यामुळे आत्मविश्वास वाढला आहे. खेळाडूंना एकमेकांवर विश्वास आहे. तसंच आपले काही खेळाडू यापूर्वी इंग्लंडमध्ये खेळले आहेत. आपली बॅटींग अनुभवी असून भारत ही मालिका 3-2 नं जिंकू शकतो.” असे मत राहुल द्रविड यांनी व्यक्त केले आहे. या मालिकेत भारत अश्विन आणि जडेजा या दोन स्पिन बॉलर्सना घेऊन खेळू शकतात हे दोघे बॉलिंगप्रमाणे बॅटींगमध्येदेखील मोलाचे योगदान देऊ शकतात असे मत राहुल द्रविड यांनी व्यक्त केले आहे.

हि लक्षवेधी लढत
राहुल द्रविडने इंग्लंडच्या टीमबद्दल आपले मत मांडताना सांगितले कि, “इंग्लंडचे फास्ट बॉलर्स चांगले आहेत. त्यांच्याकडं याबाबत अनेक पर्याय आहेत. जो रुट सारखा जागतिक स्तरावराचा बॅट्समन आहे तसेच बेन स्टोक्ससारखा ऑलराउंडर आहे त्यांच्याकडे आहे. त्यांच्याविरुद्ध अश्विनने चांगली कामगिरी केली पाहिजे. हि लढत लक्षवेधी असणार आहे. भारतामध्ये अश्विनने बेन स्टोक्सविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. येत्या मालिकेत देखील ही लढत पाहायला मिळेल असे मत राहुल द्रविड यांनी मांडले आहे.

Leave a Comment