विराट कोहलीला मोठा धक्का ! ‘या’ जवळच्या व्यक्तीचे झाले निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला इंग्लंड दौऱ्यापूर्वी एक मोठा धक्का बसला आहे. विराट कोहलीला लहाणपणी बॅटींग शिकवणारे कोच सुरेश बत्रा यांचे निधन झाले आहे. ते 53 वर्षांचे होते. विराट कोहलीने पश्चिम दिल्लीच्या क्रिकेट अकादमीमध्ये राजकुमार शर्मा यांच्या अकादमीमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले होते. त्यावेळी सुरेश बत्रा हे या अकादमीमध्ये सहाय्यक कोच होते. सुरेश बत्रा यांनी सर्वप्रथम विराट कोहलीची गुणवत्ता ओळखली होती.

‘सुरेश बत्रा गुरुवारी सकाळी पूजा करताना अचानक खाली पडले. त्यातच त्यांचे निधन झाले.’ अशी माहिती वरिष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकपल्ली यांनी दिली आहे. तसेच लोकपल्ली यांनी एक फोटो ट्विट करत बत्रा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. विराट कोहली सुपरस्टार होण्यापूर्वी राजकुमार शर्मा आणि सुरेश बत्रा या दोघांनीच त्याच्यातील गुणवत्तेला पैलू पाडले होते. तसेच 2018 मधील अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये फायनलमध्ये विराटसह शतक झळकावणाऱ्या मनजोत कालाराला देखील बात्रा यांनी प्रशिक्षण दिले होते.

एका सिक्समध्ये दिसली होती विराटची गुणवत्ता
सुरेश बत्रा यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांना विराटची प्रतिभा सर्वप्रथम कधी जाणवली याबाबद्दलचा किस्सा सांगितला आहे. ‘अंडर-14 मॅचमध्ये विराटने एक जबरदस्त शतक झळकावले होते. त्या सामन्यात त्याने एक बॉल अतिशय सहजपणे ओळखला आणि मिड-विकेटच्या दिशेला सिक्स लगावला. 10 वर्षाच्या मुलासाठी तो एक जबरदस्त शॉट होता.’ याच सिक्समुळे विराटमधील गुणवत्ता पहिल्यांदा जाणवली अशी माहिती सुरेश बत्रा यांनी दिली होती.

Leave a Comment