Friday, January 27, 2023

‘पँट का घातली नाहीस..?’ ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या ट्रोलिंगला दिनेश कार्तिकने दिले ‘हे’ उत्तर

- Advertisement -

चेन्नई : वृत्तसंस्था – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बीसीसीआयने आईपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू आपआपल्या घरी परतले आहेत. हे सर्व खेळाडू घरी परतल्यानंतर कोरोनाची लस घेत आहेत. आतपर्यंत विराट कोहली, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, चेतेश्वर पुजारा, उमेश यादव या भारतीय खेळाडूंनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. आता भारताचा अनुभवी विकेटकिपर बॅट्समन दिनेश कार्तिक याने देखील कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे.

दिनेश कार्तिकने कोरोना लस घेतल्यानंतरचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. त्याचा फोटो पाहून त्याचा कोलकाता नाईट रायडर्सचा जुना सहकारी ख्रिस लीन याने त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्याला कार्तिकने मजेशीर उत्तर देत ख्रिस लीनची बोलती बंद केली आहे. कार्तिकने कॅमोफ्लेज ट्राऊजर घालून लस घेतली आहे. त्याचा हा फोटो पाहून ख्रिस लीनने ‘किमान पँट तरी घालू शकला असतास’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या या प्रतिक्रियेवर दिनेश कार्तिकने ‘मी तुझ्यासारखंच शॉर्ट घालण्याचा विचार करत होतो. पण मला जाणीव झाली की मी मालदीवमध्ये नाही. त्यामुळे मी हा ड्रेस घातला.’ असे उत्तर दिले.

- Advertisement -

आयपीएल रद्द केल्यानंतर बाकी देशाचे खेळाडू आपल्या घरी गेले आहेत पण ऑस्ट्रेलियन खेळाडू हे अजून मालदीवमध्येच आहेत. ऑस्ट्रेलियन सरकारने या खेळाडूंना घातलेली बंदीची मुदत 15 मे रोजी संपणार आहे. त्यानंतर हे खेळाडू आपल्या घरी परतणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा आक्रमक ओपनिंग बॅट्समन ख्रिस लीन यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत होता. त्याला मागील वर्षी झालेल्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने 2 कोटीं रुपयांना खरेदी केले आहे. त्याने आतपर्यंत मुंबई इंडियन्सकडून एकच मॅच खेळली आहे.