मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात होणार आहे. या आयपीएलनंतर लगेच टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. त्यामुळे सर्व आयपीएल फ्रँचायझींमध्ये चांगले खेळाडू करारबद्ध करण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. फक्त 2 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळलेल्या बॉलरला खरेदी करण्यासाठी सध्या 3 आयपीएल टीमांमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली आहे.
ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर नॅथम एलिससाठी ही चुरस रंगली आहे. त्याची ऑस्ट्रेलियानं टी20 वर्ल्ड कपच्या टीममध्ये राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याला खरेदी करण्यासाठी 3 आयपीएल टीम उत्सुक आहेत, असा दावा ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’कडून करण्यात आला आहे. 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान आयपीए स्पर्धेचा दुसरा टप्पा होणार असून यामध्ये 31 सामने खेळवण्यात येणार आहे.
26 वर्षांच्या नॅथन एलिसनं बांगलादेश विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानं पहिल्याच मॅचमध्ये हॅट्ट्रिक घेण्याचा पराक्रम केला आहे. एलिसनं आजवर 2 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये 10 च्या सरासरीनं 5 विकेट्स घेतल्या आहेत. तसंच त्याचा इकॉनॉमी रेट हा 6 च्या जवळपास आहे. त्यानं त्याच्या टी20 कारकिर्दीमध्ये 33 मॅचमध्ये 38 विकेट्स घेतल्या आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं एलिसला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी अजून परवानगी दिली नाही आहे. ही परवामगी मिळताच त्याच्या आयपीएल टीममधील कराराबाबत शिक्कामोर्तब होणार आहे.