1983 World Cup :”कपिल त्या संपूर्ण स्पर्धेत शानदार खेळाला होता”- वेंगसरकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय संघाचे माजी फलंदाज असलेले दिलीप वेंगसरकर म्हणाले की, 1983 चा वर्ल्ड कप जिंकणे हा भारतासाठी एक मैलाचा दगड ठरला ज्याने भारतीय क्रिकेटमध्ये एक खूप मोठा बदल घडवून आणला. ते म्हणाले की,” क्रिकेटमध्ये भारताने जो कि आता या देशात एक धर्म बनला आहे, मागे वळून पाहिले नाही, .

कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने 25 जून 1983 रोजी दोन वेळा विश्वविजेतेपद जिंकलेल्या वेस्ट इंडिजला हरवून पहिला विश्वचषक जिंकला. भारतातून याची कोणालाही अपेक्षा नव्हती मात्र कपिलच्या या टीमने सर्वांना चकित केले आणि ट्रॉफी उंचावली.

वेंगसरकर यांनी आयएएनएसला सांगितले की, “भारतीय क्रिकेटमध्ये घडलेली ही एक सर्वात मोठी घटना आहे.” या विजयाबद्दल वेंगसरकर यांनी कॅप्टन कपिल देव यांचे कौतुक केले आहे. कपिलने या विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्धच्या 175 धावांच्या खेळीसह एकूण 303 धावा केल्या होत्या. या खेळीला वनडे इतिहासातील सर्वात नेत्रदीपक डाव म्हंटले जाते.

ते म्हणाले, “भारतीय क्रिकेटने तिथून मागे वळून पाहिलेच नाही. आम्ही तिथूनच प्रगती केली. मला आठवते की कपिलने उत्तम कामगिरी केली होती आणि तो सामनावीर देखील झाला होता.” उजव्या हाताचा हा माजी फलंदाज म्हणाला, “आम्ही सर्व अंदाज मोडून विंडीजला पराभूत केले. कपिलने या संपूर्ण स्पर्धेत उत्तम प्रदर्शन केले.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment