धोनी आणि रोहित बनले गेल्या १२ वर्षांतले आयपीएलचे सर्वोत्तम कर्णधार, तर कोहलीला मिळाले हे स्थान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमियर लीगने शनिवारी १२ वर्षे पूर्ण केली आहे आणि यानिमित्ताने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यांची संयुक्तपणे या लीगचे सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून निवड झाली आहे. याशिवाय स्टार स्पोर्ट्सच्या तज्ज्ञ मंडळानेही आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूंची निवड केली आहे.

निर्णायक मंडळाला धोनी आणि रोहित दोघांनाही निवडता आले नाही आणि म्हणूनच दोघांनाही संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले. धोनीच्या नेतृत्वात ११ पैकी १० हंगामात संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे, तर रोहितच्या नेतृत्वात मुंबईने ७ हंगामांपैकी चार वेळा विजेतेपद जिंकले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला आयपीएलचा महान भारतीय फलंदाज म्हणून निवडले गेले आहे. या स्पर्धेत कोहलीने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने आयपीएलच्या १७७ सामन्यात ३७.८४ च्या सरासरीने ५४१२ धावा केल्या आहेत.त्याच्या संघातील अब्राहम डीविलियर्सला लीगचा सर्वकालिक महान फलंदाज म्हणून निवडण्यात आले आहे.

लसिथ मलिंगा लीगचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवडला गेला.मलिंगाने आयपीएलच्या १७० सामन्यात १२२ बळी घेतले आहेत. चेन्नईकडून खेळणार्‍या ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसनला लीगचा महान अष्टपैलू खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे.

निर्णायक मंडळामध्ये ५० लोक होते, ज्यात २० माजी क्रिकेटपटू, १० क्रीडा पत्रकार, १० स्टॅटिशियन, सात ब्रॉडकास्टर आणि तीन अँकर यांचा समावेश होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment