Friday, January 27, 2023

बॉलरला मारण्यासाठी धावला होता मियांदाद, किरण मोरेची केली होती नक्कल ( Video)

- Advertisement -

कराची : वृत्तसंस्था – पाकिस्तान क्रिकेटमध्ये 12 जून हा खास मानला जातो. या दिवशी 1957मध्ये पाकिस्तानचा दिग्गज बॅट्समन जावेद मियांदाद यांचा जन्म झाला. जावेद मियांदाद यांनी पाकिस्तानच नाही तर संपूर्ण क्रिकेट विश्वात आपली छाप पाडली आहे. त्यांनी न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्याच टेस्टमध्ये 163 रनची खेळी केली होती. मियांदाद यांची टेस्ट क्रिकेटमधील सरासरी कधीही 50 पेक्षा कमी झाली नाही. त्यांनी टेस्ट कारकिर्दीच्या चौथ्या इनिंगमध्येच द्विशतक झळकावले होते. जावेद मियांदाद यांच्या नावावर सहा द्विशतकाची नोंद आहे. सर्वात विशेष म्हणजे विदेशामध्ये 15 वेळा LBW झालेले मियांदाद पाकिस्तानमध्ये मात्र फक्त एक वेळा LBW झाले.

https://youtu.be/_PpDtce9zd4

- Advertisement -

जावेद मियांदाद यांनी आतापर्यंत सहा वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले होते. 1981 साली पर्थमध्ये झालेल्या एका टेस्टमध्ये जावेद मियांदाद यांची एक कृती चांगलीच वादग्रस्त ठरली होती. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर डेनिस लिली यांच्यावर त्यांनी रागाने बॅट उगारली होती. विशेष म्हणजे त्यावेळी ते पाकिस्तानचे कॅप्टन होते. मियांदादला कॅप्टन केल्यानंतर टीममधील काही सीनियर खेळाडू खूश नव्हते असेदेखील बोलले जात आहे.

1992 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताचे विकेट किपर किरण मोरे यांना चिडवण्यासाठी मियांदाद यांनी मैदानात बेडुक उड्या मारल्या होत्या. त्यांची हि कृती आजही अनेक क्रिकेट रसिकांच्या लक्षात आहे. जावेद मियांदाद यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये 23 शतक आणि 43 अर्धशतकांच्या मदतीने एकूण 8832 रन काढले आहेत. त्यांनी 223 वन-डे मध्ये एकूण 7381 रन केले होते. त्यांच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये 17 आणि वन-डे मध्ये सात विकेट्स देखील आहेत.