या दिवशी:टी-२० वर्ल्ड कपमधील पराभवानंतर जेव्हा धोनीने ऑस्ट्रेलियन पत्रकाराला केले होते ट्रोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । या दिवशी, अगदी ४ वर्षांपूर्वी वेस्ट इंडीज संघाने टी -२०विश्वचषक २०१६ मधील उपांत्य सामन्यात भारताला ७ गडी राखून पराभूत केले होते. या सामन्यात वेस्ट इंडिजसमोर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने १९३ धावांचे लक्ष्य दिले होते. या सामन्यानंतर तत्कालीन भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने निवृत्तीच्या प्रश्नावर एका ऑस्ट्रेलियन पत्रकाराला ट्रोल केले होते.

खरं तर, सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियन पत्रकार सॅम्युअल फेरीसने धोनीला विचारले की ३४ व्या वर्षी टी -२० उपांत्य सामन्यात भारत पराभूत झाल्यानंतर त्याला आणखी खेळायचे आहे का?

सुरुवातीला धोनीने सॅमुअलला हा प्रश्न पुन्हा सांगायला सांगितला आणि नंतर त्याने सॅमुअलला स्वतःकडे बोलावले आणि सांगितले की आपण थोडी मजा करूया.
धोनीने सॅमुअलला विचारले ‘तुला वाटते का मी रिटायर्ड व्हावे ?’

प्रत्युत्तरात सॅमुअल म्हणाला, ‘नाही, मला ते नको आहे. मला हे विचारायचे होते. ‘

यानंतर धोनी म्हणाला, ‘मला वाटलं की हा भारतीय पत्रकार आहे, कारण मी तुम्हाला हे विचारू शकत नाही तुमचा मुलगा किंवा भाऊ विकेटकीपर आहे की नाही.मला धावताना पाहून आपल्याला असे वाटते का मी अनफिट आहे ?’

सॅमुअल म्हणाला,’नाही, तुम्ही खूप वेगाने धावता. ‘

मग धोनीने विचारले, ‘तुम्हाला वाटते की मी २०१० चा वर्ल्ड कपमध्ये खेळू शकेन?’

यावर त्याने उत्तर दिले, “हो तुम्ही खेळायला हवे.” यानंतर कॅप्टन कूल म्हणाले, “तुम्हीच माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले.”

उल्लेखनीय आहे की या सामन्यात विराटने कोहलीच्या ४७ चेंडूत ८९ धावांच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी केली आणि एवढी मोठी धावसंख्या उभारली. कोहलीशिवाय रोहित शर्माने ४३ आणि अजिंक्य रहाणेने ४० धावा केल्या.

१९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडीज संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती, त्यांच्या दोन विकेट १९ धावांवर पडल्या होत्या.पण यानंतर चार्ल्स (५२) आणि सिमिन्स (८२*) यांनी डावाची सुत्रे आपल्या ताब्यात घेतली आणि शेवटी आंद्रे रसेलने २० चेंडूंत ४३ धावा केल्या आणि सामना वेस्ट इंडीज संघाने जिंकला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

Leave a Comment