Cricket Online Betting : ऑनलाईन सट्टेबाजी बंद होणार? प्रकरण कोर्टात, सरकारला नोटीस

Cricket Online Betting
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Cricket Online Betting। सध्या इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल अंतिम टप्प्यात असून सट्टेबाजीलाही ऊत आला आहे. क्रिकेटसह इतर खेळांवर ऑनलाईन अँपच्या माध्यमातून पैशाचा सट्टा लावणाऱ्या सट्टेबाजींची देशात कमी नाही. ड्रीम ११ सारखे असे अनेक अँप्स आहेत जय माध्यमातून क्रिकेटवर सट्टा खेळला जातो आणि पैसे कमवण्याचा प्रयत्न होतो. देशातील अनेक तरुणांना या सट्टेबाजीचे जणू व्यसनच लागलं आहे. मात्र आता या सट्टेबाजांच्या छातीत धडकी भरवणारी बातमी समोर येत आहे.

सट्टेबाजी विरोधात याचिका- Cricket Online Betting

ऑनलाइन सट्टेबाजी व जुगार खेळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अ‍ॅपवर निर्बंध आणण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल झाली आहे. केए पाल असं सदर याचिकाकर्त्यांचे नाव असून त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठात सुनावणी सुद्धा पार पडली आहे. याचिकाकर्त्याने आरोप केला आहे की अनेक प्रभावशाली व्यक्ती, अभिनेते आणि क्रिकेटपटू अशा ऑनलाइन अॅप्सचा प्रचार करत आहेत आणि सट्टेबाजीसाठी (Cricket Online Betting) मुलांना आकर्षित करत आहेत. सिगारेटच्या बाबतीत, पाकिटावर धूम्रपानाचे दुष्परिणाम दर्शविणारी चित्रे असतात. परंतु, बेटिंग अॅप्सच्या बाबतीत अशी कोणतीही चेतावणी देण्यात आलेली नाही. सध्या सुरू असलेल्या आयपीएल दरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटूंनीही अशा अॅप्सचा प्रचार केला आहे हि बाब याचिकाकर्त्याने नमूद केली.

यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही हे प्रकरण गांभीर्याने घेतलं. आयपीएलच्या नावाखाली अनेक लोक सट्टा आणि जुगार खेळत आहेत. ही एक गंभीर समस्या आहे असं कोर्टाने म्हंटल. कायदे करून लोकांना स्वेच्छेने सट्टेबाजी करण्यापासून रोखता येणार नाही. आजकाल आपण आपल्या मुलांना इंटरनेट दिले आहे. मुलांचे आईवडील टीव्ही पाहतात, तर मुले दुसरच काहीतरी बघतात असं म्हणत हि एक सामाजिक विकृती असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं. तसेच याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. कोर्टाने केंद्र सरकारकडून उत्तर मागवले आहे. आम्ही केंद्र सरकारला विचारू की ते या मुद्द्यावर काय करत आहे? असं कोर्टाने म्हंटल.