पीसीबीने इंग्लंड दौर्‍यासाठी युनूस खानला टीमची दिली हि खास जबाबदारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानने इंग्लंड दौर्‍यासाठी मंगळवारी माजी कर्णधार युनूस खान याची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून आणि राष्ट्रीय संघाचा मुश्ताक अहमद यांची फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. ११८ कसोटी सामन्यांत खेळलेला युनूस पाकिस्तानच्या दृष्टीने अत्यंत यशस्वी फलंदाज ठरला आहे. त्याच्या कारकीर्दीतील सर्वाधिक धावा ३१३ धावा आहेत. आयसीसी क्रमवारीत तो जगातील पहिल्या क्रमांकाचा कसोटी फलंदाजही ठरला आहे.

इंग्लडमध्ये पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. ८ जुलै रोजी हा दौरा सुरू होईल. दोन्ही संघ २९ ऑगस्टपासून तीन टी -२० सामन्यांची मालिका देखील खेळतील. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) चीफ एक्झिक्युटिव्ह वसीम खान म्हणाले की, “मी युनिस खानसारख्या जागतिक फलंदाजाची राष्ट्रीय संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड केल्याचा मला आनंद झाला आहे.” ‘

माजी लेगस्पिनर मुश्ताक अहमदने पाकिस्तानकडून ५२ कसोटी सामन्यांमध्ये १८५ गडी बाद केले आहेत. यापूर्वी तो इंग्लंड आणि वेस्ट इंडीज या संघांचा फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकही होता. वसीम म्हणाला, “मुश्ताक इंग्लंडमधील परिस्थितीला चांगल्याप्रकारे समजतो. तेथे त्याने काउन्टी क्रिकेट खेळण्यात आणि इंग्लंड क्रिकेट संघाबरोबर काम करण्यासाठी बराच वेळ घालवला आहे. फिरकीपटूंना मदत करण्याबरोबरच मुश्ताक सामनाच्या रणनीतीमध्ये (मुख्य प्रशिक्षक) मिसबाह उल हकला मदत करू शकेल. “

युनूस म्हणाला की, पुन्हा पाकिस्तान क्रिकेटमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याचा मला अभिमान वाटतो. तो म्हणाला, “पाकिस्तानी संघात काही अतिशय हुशार क्रिकेटपटू आहेत. मिसबाह-उल-हक, मुश्ताक अहमद आणि वकार युनूस यांच्यासह आम्ही त्यांचात सुधार करण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या वतीने चांगली तयारी करू. “युनिस व मुश्ताक यांचा प्रशिक्षक टीममध्ये समावेश केल्याबद्दल मिसबाहने त्यांचे स्वागत केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment