जोफ्रा आर्चरचे 6 वर्षांपूर्वीचे ‘ते’ ट्विट होत आहे वायरल

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – यंदाच्या आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने ती मध्यावर स्थगित करण्यात आली होती. आता हि स्पर्धा यूएईमध्ये होणार आहे. शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक अजून जाहीर करण्यात आले नाही आहे. हे सामने सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार आहे. बीसीसीआयने युएईमध्ये आयपीएल घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मिम्स वायरल झाले होते. राजस्थान रॉयल्सचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर याने 6 वर्षांपूर्वी एक ट्विट केले होते ते आता मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. राजस्थान रॉयल्सकडून या ट्विटची दखल घेण्यात आली आहे.

जोफ्रा आर्चरचे ट्विट वायरल होण्याची हि काही पहिलीच वेळ नाही. त्याच्या अनेक जुन्या ट्विटचे संदर्भ आजच्या काळात सापडतात. आर्चरने 2015 सााली दुबईमध्ये जायचं आहे अशा प्रकारचे ट्विट केले होते. यावर राजस्थान रॉयल्सने हे रिट्विट करत ‘तुला माहिती होतं जोफ्रा’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सने 7 पैकी 3 सामने जिंकून गुणतालिकेत 5व्या स्थानी आहे. राजस्थानचा पहिल्या सामन्यात पंजाब विरुद्ध 4 धावांनी निसटता पराभव झाला होता.

यानंतर त्यांनी ख्रिस मॉरीसने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स विरुद्धचा दुसरा सामना जिंकला होता. यानंतर त्यांना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पराभव पत्करावा लागला होता. या 2 पराभवानंतर राजस्थानने सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध विजय मिळवला होता. यानंतर त्यांना मुंबई इंडियन्स विरुद्ध पुन्हा पराभव पत्करावा लागला होता.