Tuesday, February 7, 2023

‘या’ खेळाडूला आंतरराष्ट्रीय स्तरावर कसोटी खेळायला संधी न मिळणे हे भारताचे नुकसान आहे’-रवी शास्त्री

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रणजी करंडकात ११ हजार धावा आणि तीस शतके झळकावणाऱ्या अमोल मुझुमदारला भारताकडून कधीही कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. यावर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की,” मुझुमदारने आंतरराष्ट्रीय स्तरावर कसोटी न खेळणे हे भारताचे नुकसान आहे.

रवी शास्त्री आपल्या आठवणींच्या बॉक्समधून क्रिकेट विषयीच्या अनेक मजेशीर गोष्टी बाहेर आणतात. आजच्या भागात त्यांनी आज त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर रणजी ट्रॉफीचा फलंदाज अमोल मुझुमदार याचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो रवि शास्त्रीच्या शेवटच्या रणजी मोसमातील आहे.

- Advertisement -

 

हे सुंदर छायाचित्र पोस्ट करत शास्त्रींनी लिहिले, “रणजी करंडकातील खेळाडू – अमोल मुझुमदार याचा फोटो. माझा शेवटचा सिझन तर त्याचा पहिला सिझन होता. मला अजूनही वाटते की, मुझुमदारने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट न खेळल्यामुळे भारताचे नुकसान झाले होते.”

घरगुती क्रिकेटमधील मजुमदारचा प्रवास खूपच मस्त आहे. २० वर्षांच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने ११,००० धावा केल्या असून त्यात सुमारे ३० शतकांचा समावेश आहे. लँकशायर आणि यॉर्कशायरमार्फत त्याला बीसीसीआय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ग्रेट ब्रिटन कडून कोचिंगचे सर्टिफिकेटही मिळाले आहे.

गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका टिम जेव्हा भारत दौर्‍यावर आली होती, तेव्हा मजुमदार याची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून या पाहुण्या संघाने नेमणूक केली होती. याशिवाय तो नेदरलँड्सचा फलंदाजी प्रशिक्षकही होता आणि आता आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सचाही फलंदाजी प्रशिक्षक आहे. मुझुमदारने एनसीए येथे भारताच्या अंडर -१९ आणि अंडर -२३ संघालाही कोचिंग दिलेली आहे
.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.