Tuesday, March 21, 2023

सचिन तेंडुलकरने जागतिक क्रिकेटमधील ‘या’ ५ खेळाडूंना म्हंटले आपले सर्वात आवडते अष्टपैलू खेळाडू

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने त्या पहिल्या पाच दिग्गज खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत ज्यांना तो आपले आवडते अष्टपैलू मानतो. “मी जगातील पाच अव्वल अष्टपैलू खेळाडूंकडे पाहत मोठा झालो आहे.त्यापैकी एक असलेले कपिल देव यांच्याबरोबर सुद्धा मी खेळलो आहे.दुसरे म्हणजे ज्याच्या विरुद्ध मी पहिल्यांदा परदेशात खेळलो आणि मी इम्रान खान विरूद्धही खेळलो आहे. “

तो म्हणाला, “तिसरे सर रिचर्ड हॅडली आहे,ज्याच्या विरुद्ध मी माझ्या दुसर्‍या परदेश दौर्‍यावर खेळलो होतो आणि तो दौरा न्यूझीलंडचा होता.त्यानंतर मी माल्कम मार्शल आणि इयान बोथम यांच्याविरूद्धही खेळलो आहे.म्हणून हे माझे पहिले पाच अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यांना खेळताना पाहूनच मी मोठा झालो आहे आणि त्यांच्या विरुद्ध खेळण्याची संधी मला मिळाली. “

- Advertisement -

कोरोना साथीच्यामुळे २९ मार्चपासून सुरू होणारी आयपीएल यापूर्वी १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती.त्यानंतर बीसीसीआयने आयपीएल अनिश्चित काळासाठी तहकूब केले. मात्र, या वर्षाच्या अखेरीस ही स्पर्धाखेळवण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.